मांजरीचं पिल्लू आजारी पडलं; मग काय या मनीमाऊने स्वतःच रुग्णालयात नेलं, पाहा व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 18:18 IST2020-05-01T17:59:05+5:302020-05-01T18:18:29+5:30

फक्त मांजरच नाही तर मांजरीची पिल्लं सुद्धा सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून येत आहेत.

Istanbul cat carried her kitten to a hospital heartwarming pics goes viral myb | मांजरीचं पिल्लू आजारी पडलं; मग काय या मनीमाऊने स्वतःच रुग्णालयात नेलं, पाहा व्हायरल फोटो

मांजरीचं पिल्लू आजारी पडलं; मग काय या मनीमाऊने स्वतःच रुग्णालयात नेलं, पाहा व्हायरल फोटो

सोशल मीडियावर सध्या मांजरींचा फोटो खूप व्हायरल होत आहेत. फक्त मांजरच नाही तर मांजरीची पिल्लं सुद्धा सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून येत आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही पण एका मांजरीने आपल्या पिल्लाला थेट रुग्णालयात नेलं आहे. मांजरीला अशाप्रकारे आपल्या पिल्लासोबत पाहून रुग्णालयातील स्टाफ या मांजरींकडे पाहू लागला. 

हा फोटो तुर्कीमधील इस्तांबुलमधील आहे.  माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार येथे हजारोंच्या संख्येने मांजरी आहेत. त्या ठिकाणी असलेल्या स्टाफने या रुग्णालयात आलेल्या मांजरीला खायला प्यायला देऊन मांजरीच्या पिल्लाला उपचारासाठी घेऊन गेले.  मांजरीसह तिच्या पिल्लाचा फोटो मर्वी ओजकन या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये रुग्णालयातील कर्मचारी मांजरींशी प्रेमाने खेळताना दिसून येत आहेत. ( हे पण वाचा- बाबो! पॅण्ट न घालताच आला लाईव्ह, कॅमेराने 'अशी' केली पोल खोल, पहा व्हायरल व्हिडीओ)

हा फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. आतापर्यंत ८० हजार लाईक्स आणि हजारांपेक्षा जास्त कमेंट या फोटोवर आल्या आहेत.  इस्तांबुलमध्ये सर्वाधिक लोकांकडे पाळीव प्राणी आहेत. प्राण्यासाठी ही जागा खूप सुरक्षित असल्याचं एका युजरने कमेंट केली आहे. ( हे पण वाचा- वेदनादायी! भुकेने व्याकूळ झालेल्या मुलांना शांत करण्यासाठी आईने पाण्यात उकळले दगड) 

Web Title: Istanbul cat carried her kitten to a hospital heartwarming pics goes viral myb