असंच पाहिजे! दुसऱ्याला पाडायला गेली अन् स्वत:च स्कूटीवरून धाडकन पडली; Video तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 17:49 IST2022-11-09T17:48:03+5:302022-11-09T17:49:28+5:30
तरुणी तिच्या बाजूने जाणाऱ्या बाईकला किक मारते. बाईकला किक मारल्यावर तिचा तोल जातो आणि ती स्वत: स्कूटीवरून खाली पडली.

असंच पाहिजे! दुसऱ्याला पाडायला गेली अन् स्वत:च स्कूटीवरून धाडकन पडली; Video तुफान व्हायरल
आजकाल रस्ते अपघातांची माहिती गोळा करण्यासाठी रस्त्यावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जाते. ज्याद्वारे दररोज होणाऱ्या या अपघातांबद्दल माहिती मिळते. त्याचबरोबर अलीकडच्या काळात झपाट्याने वाढणाऱ्या ब्लॉगर्समुळे रस्त्यावरील काही घटना अचानक कॅमेऱ्यात कैद होत आहेत. ज्यातील काही व्हि़डीओ हे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी रस्त्याने जाताना चूक करताना दिसत आहे. ज्याची शिक्षा तिला अवघ्या काही सेकंदातच मिळते. व्हायरल होत असलेली ही क्लिप सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केली जात आहे. यामध्ये एक तरुणी तिच्या मित्रासोबत स्कूटीच्या मागे बसलेली दिसत आहे.
तरुणी तिच्या बाजूने जाणाऱ्या बाईकला किक मारते. बाईकला किक मारल्यावर तिचा तोल जातो आणि ती स्वत: स्कूटीवरून खाली पडली. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. काही युजर्सनी यावर जैसी करनी वैसी भरनी असं म्हटलं आहे. तसेच अनेकांनी मुलीवर टीकाही केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.