Video - हृदयस्पर्शी! पायाला दुखापत तरी रस्त्याच्या कडेला 'कीचेन' विकत होता चिमुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 17:17 IST2023-06-22T17:07:41+5:302023-06-22T17:17:28+5:30

एका ट्रॅफिक पॉईंटवर जखमी असलेला एक लहान मुलगा कीचेन विकताना दिसत आहे.

injured little boy selling keychains at traffic point in gujarat internet is concerned about this viral video | Video - हृदयस्पर्शी! पायाला दुखापत तरी रस्त्याच्या कडेला 'कीचेन' विकत होता चिमुकला

Video - हृदयस्पर्शी! पायाला दुखापत तरी रस्त्याच्या कडेला 'कीचेन' विकत होता चिमुकला

सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत असून लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. गुजरातमधील एका ट्रॅफिक पॉईंटवर जखमी असलेला एक लहान मुलगा कीचेन विकताना दिसत आहे. साक्षी नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याला आतापर्यंत 7.9 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

गुजरातमधील एका ट्रॅफिक पॉईंटवर कीचेन विकत असलेल्या या चिमुकल्याचं नाव आणि इतर माहिती समोर आलेली नाही. ट्रॅफिक पॉईंटवर थांबलेल्या एका व्यक्तीने त्याच्याशी बोलून व्हिडीओ रेकॉर्ड केला. व्हिडिओमध्ये मुलाच्या पायाला दुखापत झालेली पाहायला मिळत आहे. जखम झालेल्या पायाला आणखी दुखापत होऊ नये म्हणून कापड आणि प्लास्टिकने तो झाकलेला आहे.

या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वाचंच लक्ष वेधून घेतलं आहे. लोकांनी सुचवलं की, या चिमुकल्यांवर तात्काळ वैद्यकीय उपचार करावेत अन्यथा इजा होऊन गँगरीन होऊ शकतं. लोक त्याचा पत्ता किंवा कॉन्टॅक्ट नंबर विचारत होते जेणेकरून ते त्याला मदत करू शकतील.

एका युजरने लिहिलं की, “या घटनेचा मनावर खूप वाईट परिणाम होतो. कोवळ्या वयात जेव्हा त्याला प्रेम आणि काळजी मिळायला हवी होती आणि निरागसतेत जगायला हवं होतं, त्याऐवजी तो दुःखातून जात आहे आणि जीवनातील सर्वात क्रूर वास्तवाचा साक्षीदार आहे.” एका हिंदी वेबसाईटन याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: injured little boy selling keychains at traffic point in gujarat internet is concerned about this viral video