शौक बड़ी चीज है! अब्जाधीशाच्या हातात चहाचा कप अन् 5 रुपयांचा Parle-G; फोटो व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 02:10 PM2022-07-25T14:10:35+5:302022-07-25T14:29:43+5:30

गेल्या अनेक दशकांपासून पार्ले-जीने गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत, अनेकांना वेड लावले आहे.

IndiGo MD Rahul Bhatia having A cup of tea and Rs 5 Parle-G in plane | शौक बड़ी चीज है! अब्जाधीशाच्या हातात चहाचा कप अन् 5 रुपयांचा Parle-G; फोटो व्हायरल...

शौक बड़ी चीज है! अब्जाधीशाच्या हातात चहाचा कप अन् 5 रुपयांचा Parle-G; फोटो व्हायरल...

googlenewsNext

नवी दिल्ली: 1929 मध्ये सुर झालेला पार्जे-जी बिस्किटाचा प्रवास आजही कायम आहे. गेल्या अनेक दशकांपासून पार्ले-जी बिस्किटाने भारतीयांच्या मनावर राज्य केले आहे. भलेही कंपनीने पार्ले-जी बिस्किटाच्या पाकीटाची साइज कमी केली, पण चवीमध्ये थोडाही बदल झाला नाही. या चवीमुळेच गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत, सर्वांनाच बिस्किटाने वेड लावले आहे. 

चवीशी तडजोड नाही
गरिबांसाठी पार्ले-जी हा प्रवासातला सोबती तर आहेच, पण श्रीमंतांनाही या बिस्किटाने भुरळ पाडली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इंडिगो एअरलाइन्सचे सह-संस्थापक आणि एमडी राहुल भाटिया (IndiGo MD Rahul Bhatia) फ्लाइट दरम्यान चहा आणि 5 रुपयांचे पार्ले-जी बिस्किट खाताना दिसत आहेत. व्हिडिओत उद्योगपती राहुल भाटिया चहात बिस्किट बुडवून खात आहेत. यावरुन पार्ले-जीच्या लोकप्रियतेची कल्पना करता येते. राहुल भाटिया हे साधेपणासाठी ओळखले जातात. फोर्ब्सच्या मते, राहुल भाटिया आणि त्यांचे वडील कपिल भाटिया यांची रिअल टाइम नेट वर्थ सुमारे $4.7 अब्ज (सुमारे 38,000 कोटी रुपये) आहे.
 
पार्ले-जीच्या प्रवासावर एक नजर टाकुया
पार्ले-जीचा प्रवास 1923 पासून सुरू झाला. हा तो काळ होता जेव्हा देशात ब्रिटीश राजवटीविरुद्ध स्वदेशी चळवळीने जोर धरला होता. स्वदेशी चळवळ हा महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी याला स्वराज्याचा आत्मा असेही संबोधले. यातून ब्रिटीश राजवटीच्या मालावर बहिष्कार टाकून स्वतःच्या वस्तू तयार करण्यावर भर दिला जात होता. याच विचाराने 1929 मध्ये मोहनलाल दयाल यांनी 12 जणांसह मुंबईतील विलेपार्ले येथे पहिला कारखाना काढला. याच शहराच्या नावावरूनच कंपनीचे नाव 'पार्ले' पडल्याचे सांगितले जाते. पार्लेने 1938 मध्ये पार्ले-ग्लुको (पार्ले ग्लुकोज) या नावाने बिस्किटांचे उत्पादन सुरू केले. 2020 मध्ये लॉकडाऊन काळात पार्ले-जीची सर्वाधिक विक्री झाली होती. यादरम्यान पार्ले-जीचा 82 वर्षांचा विक्रम मोडला गेला.

Web Title: IndiGo MD Rahul Bhatia having A cup of tea and Rs 5 Parle-G in plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.