शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

करमत नाही म्हणून होणाऱ्या बायकोला नेलं पळवून; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नंतर मंदिरात लावलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 16:04 IST

होणाऱ्या बायकोला भेटण्याची उत्सुकता इतकी वाढली की लग्नाआधीच नवरदेव तिच्यासोबत पळून गेला.

नवी दिल्ली : आपल्या होणाऱ्या बायकोला भेटण्याची उत्सुकता इतकी वाढली की लग्नाआधीच नवरदेव तिच्यासोबत पळून गेला. मुलगी गायब होताच मुलीच्या घरात एकच खळबळ उडाली होती, मात्र नंतर जेव्हा लोकांना समजले की मुलगी तिच्या भावी पतीसोबत पळून गेली आहे तेव्हा लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, मात्र तोपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. ही अनोखी घटना बिहारमधील छपराच्या पानापूर ब्लॉकमध्ये घडली आहे.

दरम्यान, दरियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील अकबरपूर गावात राहणाऱ्या बोल बम साहनीसोबत राम रुद्रपूर गावातील संध्या नावाच्या मुलीचे लग्न ठरले होते. लग्नाचा निम्मा विधी पार पडला होता, त्यामुळे दोन्ही पक्ष लग्नाच्या तयारीत मग्न होते, पण लग्न पुढच्या वर्षी होणार होते. त्यामुळे संध्या आणि बोलबम यांच्यात रोज चर्चा व्हायची. या जोडप्यामधील प्रेम इतके वाढले की बोलबम संध्याशिवाय एक क्षणभरही राहू शकत नव्हता. म्हणून दोघांनी एक प्लॅन केला आणि संध्या काहीही न बोलता घरातून पळून गेली. नंतर हे जोडपे एका अज्ञात स्थळी गेले. 

पोलिसांनी लावून दिले लग्न या प्रकरणी पनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून मुलीला ताब्यात घेतले. मात्र या जोडप्यांनी सगळे काही मान्य केल्यानंतर घरचे देखील काही करू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनीही दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या नातेवाईकांच्या संमतीने स्थानिक पोलिसांच्या देखरेखीखाली ठाकूरबारी मंदिरात विवाह पार पडला. पनापूर बाजार येथील रामजानकी मंदिरात स्थानिक पोलीस ठाण्याच्या एसआय रुपम कुमारी यांनी दोन्ही पक्षांचे नातेवाईक आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत दोघांचा विवाह सोहळा पार पडला. हा अनोखा विवाह परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. मात्र दोघांचे लग्न ठरले असताना देखील ते का पळून गेलेत याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलBiharबिहारmarriageलग्नPoliceपोलिस