डिलिव्हरी बॉय सामान देण्यासाठी आला अन् त्यालाच मिळालं सरप्राईज; हृदयस्पर्शी Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:04 IST2025-01-14T13:02:01+5:302025-01-14T13:04:51+5:30
सोशल मीडियावर अनेक वेळा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होतात. हैदराबादमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हासू येईल.

डिलिव्हरी बॉय सामान देण्यासाठी आला अन् त्यालाच मिळालं सरप्राईज; हृदयस्पर्शी Video व्हायरल
सोशल मीडियावर अनेक वेळा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होतात. हैदराबादमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हासू येईल. विनीता आणि निकिता नावाच्या व्लॉगर्सनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे जो खूपच चांगला आहे आणि लोकांना तो खूप आवडतोय.
हे व्लॉगर्स स्विगी इन्स्टामार्ट आणि ब्लिंकिटवर ऑर्डर देत होते आणि वस्तू पोहोचवण्यासाठी आलेल्यांना गिफ्ट म्हणून त्याच वस्तू देत होते. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, सर्व डिलिव्हरी पार्टनर वस्तू पोहोचवण्यासाठी येतात आणि जेव्हा त्यांना सांगितलं जातं की, ही वस्तू फक्त त्यांच्यासाठी आहेत, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो.
सुरुवातीला ते थोडेसे शॉक्ड दिसतात पण नंतर ते खूप आनंदी होतात. या क्लिपमध्ये डिलिव्हरी पार्टनर्सच्या चेहऱ्यावरील आश्चर्य आणि आनंद दोन्ही दिसून येतात. व्हिडिओमध्ये त्यांचं गोड हसू आणि चमकणारे डोळे बरंच काही सांगतात. हा व्हिडीओ खरोखरच कोणाचाही दिवस आनंदात घालवण्यासाठी पुरेसा आहे. इतरांना आनंद देणं नेहमीच आनंददायी असतं असं लोक म्हणत आहेत.
हा व्हिडीओ hyd_and_me या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हे शेअर करताना, कॅप्शनमध्ये लिहिलं आहे - आपण सर्वजण हे करण्याचा प्रयत्न करू शकतो. हे छोटे प्रयत्न कसे मोठं हास्य आणतात आणि त्यांचा दिवस कसा आनंददायी बनवतात. त्यांनी स्विगी, स्विगी इन्स्टामार्ट, ब्लिंकिट यांना देखील टॅग केलं. विनिता आणि निकिताच्या या व्हिडिओला आतापर्यंत २ लाख ९५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओला २.७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.