१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 09:42 IST2025-09-23T09:41:50+5:302025-09-23T09:42:34+5:30

घटनेनंतर दोघांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी दोघांचाही मेंदूच्या रक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचे निदान केले. 

Husband dies after 128 kg wife falls on him at Rajkot; incident goes viral on social media again | १२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

राजकोटमधील एका सोसायटीमध्ये एक अपघात घडला. या अपघातात नटवरलाल नावाच्या ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. त्याची पत्नी मंजुळा यांचाही मेंदूच्या रक्तस्रावामुळे मृत्यू झाला. घरातील पायऱ्यांवरून खाली पडल्यानंतर हा अपघात घडला.  ही घटना २०१६ ची असून सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली आहे. 

५ जुलै २०१६ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा आशिष याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कुटुंब घाबरले होते. मुलाची प्रकृती पाहून मंजुळा खूप घाबरली. ती मुलाला मदत करण्यासाठी वेगाने पायऱ्या चढत होती, पण ती घसरली आणि तिचा तोल गेला. सुमारे १२८ किलो वजनाची मंजुळा पायऱ्यांवरून खाली पडली ते थेट तिचे पती नटवरलाल यांच्यावर. या विचित्र अपघातात दोघेही जखमी झाले.  घटनेनंतर दोघांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी दोघांचाही मेंदूच्या रक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचे निदान केले. 

याबाबत डॉक्टराने सांगितले होते की, "दोघांनाही सिरेब्रल हेमरेज झाला होता. पतीला डोक्यावर झालेल्या दबावामुळे रक्तस्राव तीव्र झाला, तर पत्नीला पडताना झालेल्या धक्क्याने त्यांच्याही मेंदूत रक्तस्राव झाला. दोघांचेही उपचारादरम्यान निधन झाले." याशिवाय, आशीष यांची सून निशा ही मदत करण्यासाठी पायऱ्यांवर धावताना घसरली आणि तिच्या पायाला दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती आता स्थिर होती. 

 

Web Title: Husband dies after 128 kg wife falls on him at Rajkot; incident goes viral on social media again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.