Hug day : याला म्हणतात प्रेम! सिंहानं महिलेला मारली मीठी अन् साजरा केला हग डे; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 01:45 PM2021-02-12T13:45:19+5:302021-02-12T13:55:32+5:30

Hug day 2021: हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळून येईल की माणूस आणि प्राण्यांच्या मैत्रीचे वेगळे महत्व का आहे.

Hug day : When lion hug woman people found that is the true love | Hug day : याला म्हणतात प्रेम! सिंहानं महिलेला मारली मीठी अन् साजरा केला हग डे; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....

Hug day : याला म्हणतात प्रेम! सिंहानं महिलेला मारली मीठी अन् साजरा केला हग डे; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....

googlenewsNext

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.  ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार या सिंहाचे नाव जुपिटर आहे. या जुपिटरनं या महिलेला मिठी मारली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही महिला पिंजऱ्याजवळ जाताच पिंजऱ्याच्या आत बंद असलेल्या सिंहानं आपलं अंग बाहेर काढत या महिलेला मिठी मारली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळून येईल की माणूस आणि प्राण्यांच्या मैत्रीचे वेगळे महत्व का आहे.

ज्या सिंहाला संपूर्ण जंगल घाबरतं त्याच सिंहानं या महिलेला प्रेमानं मीठी मारली आहे. हे दृश्य पाहून प्रेक्षकांचं मन हळवं झालं आहे. या व्हिडीओला १२ हजारांपेक्षा जास्त व्यूज मिळाले असून अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सिंह जंगलात असायला हवा पिंजऱ्यात नाही अशी कमेंट अनेकांनी केली आहे तर कोणी खंर प्रेम असल्याचे म्हटलं आहे. 

२०२० मध्ये त्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला होता. यावर त्यांनी कमेंट केली की प्रेमाची जाणीव या व्हिडीओच्या माध्यमातून होते. या महिलेनं सिंहाचा जीव वाचवला होता. त्या बदल्यात सिंहानं एक क्यूट  हगआणि थँक यू किस दिलेलं पाहायला मिळत आहे. या महिलेचं नाव ऐना जुलिया आहे. ही महिला एक एनिमल होम केअर चालवते.  मानलं गड्या! नोकरी सोडली अन् युट्यूबची आयडीया घेऊन शेती केली, आता घेतोय लाखोंची कमाई

या महिलेनं अनेक जनावरांचा जीव वाचवला आहे. त्याचप्रमाणे जुपीटरचेही प्राण वाचवले आहेत. त्यानंतर सर्कसमधून बाहेर काढत या सिंहाला एका प्राणीसंग्रहायलात पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी त्याची अवस्था खूपच खराब झाली होती. वजन कमी झालं होतं. याबाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या व्हिडीओच्या माध्यमातू दिसून येत आहे की, प्रेम प्रत्येकालाच समजतं, माणसू असो किंवा प्राणी.  कर्कश आवाज करणाऱ्या गाड्यांबरोबर पोलिसांनी जे केलं ते पाहून मालकांचे डोळे उघडेच राहिले, पाहा व्हिडीओ

Web Title: Hug day : When lion hug woman people found that is the true love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.