पाण्याचा वापर न करता एक्झॉस्ट फॅनचा चिकटपणा होईल दूर, लगेच फॉलो करा 'या' सोप्या टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 14:16 IST2024-10-23T14:15:25+5:302024-10-23T14:16:41+5:30
Exhaust fan cleaning tips: आज आम्ही तुम्हाला हाच एक्झॉस्ट फॅन चकाचक स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

पाण्याचा वापर न करता एक्झॉस्ट फॅनचा चिकटपणा होईल दूर, लगेच फॉलो करा 'या' सोप्या टिप्स!
Exhaust fan cleaning tips: सध्या घराघरांमध्ये दिवाळीची स्वच्छता सुरू आहे. अशात किचनची सफाई सगळ्यात महत्वाची ठरते. किचनमधील काही गोष्टींची स्वच्छता करणं सोपं असतं, पण धुरामुळे किचनमध्ये लावलेला एक्झॉस्ट फॅन चिकट आणि ऑयली होतो. अशात त्यावरील धूळ, माती, तेल, डाग साफ करणं अवघड काम असतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हाच एक्झॉस्ट फॅन चकाचक स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
बेकिंग सोडा
किचनमधील घाणेरडा झालेला एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याची मदत घेऊ शकता. यासाठी एका वाटीमध्ये बेकिंग सोडा आणि तेल मिक्स करा. आता एका कापडाच्या मदतीने एक्झॉस्ट फॅनची जाळी स्वच्छ करा. नंतर फॅन बेकिंग सोड्याच्या मदतीने घासून काढा. हे करताना फक्त ऑइल फॅनच्या मोटारपासून दूर ठेवा.
मिठाचा करा वापर
किचनमधील एक्झॉस्ट साफ करण्यासाठी तुम्ही तेल आणि मिठाचाही वापर करू शकता. यासाठी अर्धा कप तेलात मीठ टाका. आधी एक्झॉस्ट फॅनचे ब्लेड गरम पाण्यात कपडा भिजवून स्वच्छ करा. यानंतर मिठाचं मिश्रण फॅनवर लावा आणि 10 मिनिटांनंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्या. एक्झॉस्ट फॅन स्वच्छ झालेला दिसेल.
डिटर्जेंट पावडर
एक्झॉस्ट फॅनवरील चिकटपणा आणि डाग दूर करण्यासाठी डिटर्जेंट पावडर किंवा लिक्विडचा वापर बेस्ट मानला जातो. यासाठी अर्धा डिटर्जेंटमध्ये अर्धा कप तेल मिक्स करा. आता फॅनचे ब्लेड गरम पाण्यात भिजवलेल्या कापडाने स्वच्छ करा. त्याने डिटर्जेंट पावडरच्या मिश्रणाने पूर्ण फॅन घासून काढा आणि कापडाने पुसून घ्या.