शहरं
Join us  
Trending Stories
1
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
2
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
3
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
4
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
5
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
6
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
7
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
8
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
9
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
10
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
11
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
12
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
13
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
14
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
15
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
16
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
17
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
18
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
19
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
20
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी

ऊन असो वा धो-धो पाऊस; ऑर्डर आणणाऱ्या Zomato डिलिव्हरी बॉयला किती रुपये मिळतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 09:02 IST

साऱ्या धावपळीचे त्या 'डिलिव्हरी बॉय'ला किती पैसे मिळत असतील? जाणून घेऊया

Zomato Delivery Boy Earnings, Viral Video: हल्लीच्या धावपळीच्या जीवनात फूड डिलिव्हरी अ‍ॅपवरून जेवण किंवा खाद्यपदार्थ मागवणे ही एक सवयीची बाब झाली आहे. म्हणूनच या कंपन्या आज देशात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये दररोज हजारो लोक 'डिलिव्हरी बॉय' म्हणून काम करतात. फूड डिलिव्हरी ॲप्समुळे शहरात राहणाऱ्या लोकांना अन्न ऑर्डर केल्यानंतर काही मिनिटांतच घरपोच मिळते. हे खाद्यपदार्थ वेळेत डिलिव्हरी करणाऱ्या एजंट्सना यासाठी मोठी कसरत करावी लागते. या साऱ्या धावपळीचे त्या 'डिलिव्हरी बॉय'ने किती पैसे मिळत असतील? जाणून घेऊया.

प्रत्येकाच्या मनात नेहमीच प्रश्न असतो की या फूड डिलिव्हरी करणाऱ्या लोकांना खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी किती पैसे मिळतात? याचसंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय संपूर्ण प्रक्रिया आणि यातील सत्य सांगताना दिसत आहे. फूड ऑर्डर मिळण्यापासून ते जेवणाची डिलिव्हरी करण्यापर्यंतची पूर्ण प्रक्रियाच त्यांने दाखवून दिली आहे.

डिलिव्हरी बॉयने सांगितले की त्याला एका जेवणाच्या डिलिव्हरीसाठी २० रुपये मिळतात. @munna_kumarguddu नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो सांगतो की, त्याला डिलिव्हरी ऑर्डर मिळाली आहे. रेस्टॉरंटमधून ती ऑर्डर कलेक्ट करण्यासाठी त्याला सुमारे दीड किलोमीटर जावे लागणार आहे. यानंतर तो रेस्टॉरंटमध्ये जातो आणि ऑर्डर कलेक्ट करतो. ऑर्डर तयार होण्यासाठी १० मिनिटे लागतात. त्यानंतर तो ६५० मीटर जाऊन डिलिव्हरीच्या ठिकाणी पोहोचतो. तेथे डिलिव्हरी करतो आणि त्यानंतर सुमारे अर्ध्या तासात त्याने २० रुपये कमावल्याचे तो सांगतो.

या व्हिडिओला ७७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर अनेकांनी या पोस्टवर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

टॅग्स :ZomatoझोमॅटोSocial Viralसोशल व्हायरल