घोड्यावर बसून नवरदेवाची एंट्री; फटाके वाजू लागताच घोडा बिथरला, सुस्साट सुटला अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 17:34 IST2022-05-15T17:33:53+5:302022-05-15T17:34:04+5:30
एका लग्नाची अशीही गोष्ट! नवरदेवाला घेऊन घोड्यानं ठोकली धूम

घोड्यावर बसून नवरदेवाची एंट्री; फटाके वाजू लागताच घोडा बिथरला, सुस्साट सुटला अन् मग...
देशात सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. अनेकांचे दोनाचे चार हात होत आहेत. लग्नातील एकापेक्षा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नवरा-नवरीचे व्हिडीओ सर्वाधिक पाहिले जात आहेत. आता सोशल मीडियावर एका नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नवरदेवाचा व्हिडीओ त्याच्या वरातीमधला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू अनावर होईल. घोड्यावर बसून नवरदेव वरात घेऊन आला. वरात थांबली. नवरदेवाचं स्वागत सुरू होतं. तितक्यात कोणीतरी जवळच फटाके लावले. फटाके फुटू लागताच घोडा बिथरला.
फटाके फुटू लागताच घोडा खवळला. त्यानं धूम ठोकली. विशेष म्हणजे यावेळी नवरदेव घोड्यावरच बसला होता. नवरदेवाला घेऊन घोड्यानं धूम ठोकल्यावर एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.