शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

VIDEO: क्रॅश होण्याआधीच प्रवाशांनी विमानातून मारल्या उड्या आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 12:15 IST

Plane Crash Video : यात दिसत आहे की, एक विमान क्रॅश होत आहे, पण त्याआधीच त्यातील प्रवासी जीव वाचवण्यासाठी बाहेर उड्या मारतात.

Plane Crash Video :  प्लेन क्रॅश होण्याच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. कधी कधी यांचे व्हिडीओ मनात धडकी भरवणारे असतात. असाच एक प्लेन क्रॅशचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. यात दिसत आहे की, एक विमान क्रॅश होत आहे, पण त्याआधीच त्यातील प्रवासी जीव वाचवण्यासाठी बाहेर उड्या मारतात. नक्कीच असा नजारा तुम्ही फक्त एखाद्या सिनेमात पाहिला असेल.

ट्विटर अकाऊंट @interesting_aIl वर नेहमीच हैराण करणारे व्हिडीओ पोस्ट केले जातात. नुकताच या अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो फारच भयावह आहे. व्हिडिओत एक प्लेन क्रॅश होताना दिसत आहे. तेव्हाच काही प्रवासी त्यातून उड्या मारतात. हे प्लेन कोणतं होतं हे समजू शकलं नाही. 

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, प्लेन एका वस्तीच्या वरून जात आहे. बरेच लोक खालून विमान बघत आहेत. बघता बघता विमान खाली येतं. लोक उड्या मारतात आणि काही सेकंदात मोठा धमाका होतो आणि धुराळे लोळ उठतात. यातील लोकांनी पॅराशूटच्या माध्यमातून खाली उड्या मारल्या. व्हिडीओ रेकॉर्ड करणारे लोक हा नजारा बघून ओरडू लागतात आणि घाबरलेले आहेत. प्लेन एका जंगलात जाऊन पडतं.

या व्हिडिओला आतापर्यंत 1 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिलं की, जेवढ्या लोकांनी उड्या मारल्या त्यातील 2 लोकांचा जीव वाचू शकला नाही. एकाने लिहिलं की, त्या लोकांना कसं समजलं की, प्लेन क्रॅश होणार आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलairplaneविमानAccidentअपघात