Video - माणुसकीचा 'धर्म'! पुरात वाहून जाणार्या गायीला तरुणांनी वाचवलं, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 11:56 IST2023-07-24T11:45:44+5:302023-07-24T11:56:05+5:30
दोन तरुण मुसळधार पावसात एका कालव्यातून गायीला बाहेर काढताना दिसत आहेत.

Video - माणुसकीचा 'धर्म'! पुरात वाहून जाणार्या गायीला तरुणांनी वाचवलं, नेमकं काय घडलं?
एकत्र राहिल्याने कोणत्याही आव्हानाचा सामना करणे आणि कोणतेही ध्येय साध्य करणे सोपे होते. एकटं काम करणाऱ्या व्यक्तींपेक्षा एक संघ म्हणून काम करणारे लोक बलवान आणि अधिक सक्षम असतात. एकतेच्या शक्तीचं वर्णन करणारी अनेक उदाहरणं ही आपल्या दैनंदिन जीवनात पाहायला मिळतात. असाच एक व्हि़डीओ आता समोर आला आहे. एकजुटीने कठीण गोष्टी साध्य करणं सोपं होतं. हे यामध्ये पाहायला मिळतं.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. दोन तरुण मुसळधार पावसात एका कालव्यातून गायीला बाहेर काढताना दिसत आहेत. गायीची शिंगं पकडून तिला बाहेर काढण्यासाठी तरुण प्रयत्न करताना दिसतात. मात्र, गायीला बाहेर काढणं दोन तरुणांना शक्य झालं नाही. याच दरम्यान, कालव्याच्या पलीकडे अन्य काही लोकही हा प्रकार पाहत असल्याचे दिसून येत आहे.
गाय पाण्यातून वाहून जात असल्याचं पाहताच काही लोक तरुणांच्या मदतीसाठी इतरांना बोलवताना दिसत आहे. सुदैवाने कालव्याच्या पलीकडे काही लोक दिसतात. त्याचवेळी आणखी दोन मुस्लीम तरुण मदतीसाठी धावतात आणि गायीची शिंगं पकडतात. एक तरुण गायीचा पाय ओढण्यासाठी खाली वाकतो आणि गायीला पुराच्या पाण्यातून वाचवलं जातं.
पुराच्या पाण्यातून वाचल्यावर गाय क्षणभर उभी राहते आणि सर्वजण आपापल्या वाटेला जातात. मात्र, गायीची सुखरूप सुटका केल्यावर एका लहान मुलाला खूप आनंद होतो. इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून नेटिझन्स तरुणांचं कौतुक करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.