व्हायरल झालेल्या या साखरपुड्याच्या फोटोची ट्रिक वाचून म्हणाल, 'अरे वाह रे वाह!'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 12:17 PM2018-11-05T12:17:14+5:302018-11-05T12:20:48+5:30

सोशल मीडियात एक फोटो सद्या चांगलाच व्हायरल होत आहे. पण मजेदार बाब या फोटोसोबत शेअर करण्यात आलेल्या दुसऱ्या फोटोची आहे.

Hilarious truth behind this viral engagement photo will make you say Aww nails not ready | व्हायरल झालेल्या या साखरपुड्याच्या फोटोची ट्रिक वाचून म्हणाल, 'अरे वाह रे वाह!'

व्हायरल झालेल्या या साखरपुड्याच्या फोटोची ट्रिक वाचून म्हणाल, 'अरे वाह रे वाह!'

Next

सोशल मीडियात एक फोटो सद्या चांगलाच व्हायरल होत आहे. पण मजेदार बाब या फोटोसोबत शेअर करण्यात आलेल्या दुसऱ्या फोटोची आहे. तशी या फोटो मागचं सत्य विचित्रही आहे आणि मजेदारही आहे. कारण या फोटोसाठी एका बहिणीने दुसऱ्या बहिणीला केलेल्या मदतीचं कौतुक केलं जात आहे. पण यातून हेच दिसून येतंय की, लोक चांगल्या फोटोसाठी काहीही करु शकता. या घटनेत कौतुक करण्यासारखं काही नसलं तरी यातून लोकांचं फोटोबाबतचं वेड दिसून येतं.

जेव्हा एक मुलगा एका मुलीला लग्नासाठी प्रपोज करतो, तो क्षण दोघांसाठीही त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असतो. मेलबर्नमधील या कपलसाठीही हा दिवस तसाच होता. बॉयफ्रेन्डने गर्लफ्रेन्डला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं आणि सोबतच एक सुंदर अंगठीही दिली. दोघांना हा क्षण कॅमेरामध्ये कैद करायचा होता. पण तेव्हाच या एक ट्विस्ट आला.

@goodgaljenjen नावाच्या व्यक्तीने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. जीना नावाची ही मुलगी सांगतिये की, तिच्या बहिणीला बॉयफ्रेन्डने प्रपोज केलं. पण ती फोटोसाठी तयार नव्हती. म्हणजे जीनाच्या बहिणीने तेव्हा मॅनीक्योर(नखांची स्वच्छता) केलं नव्हतं. म्हणजे तिचे नखं फोटोसाठी तयार नव्हते. अशात जीनाने एक ट्रिक वापरली आणि याचंच सगळीकडे कौतुक होत आहे. 


पहिल्या फोटोत हेच दिसून येतं की, सुंदर नेलपेंट लावलेली नखे फोटोतील मुलीचे आहेत. पण मजेदार बाब म्हणजे हे सुंदर नखे असलेला हा त्या फोटोतील मुलीचा नाही तर तिची बहीण जीनाचा आहे. जीनाने एक दुसरा फोटो शेअर केला आहे. त्यात ते दिसून येतं. 

आता या कपलसाठी हा फोटो यादगार झाला आहे. पण लोक फोटोसाठी काय काय करामती करु शकतात हे यातून बघायला मिळतं. हा फोटो सोशल मीडियात शेअर केल्यावर २३ तासात या याला १३९, ८०९ वेळा रिट्विट केलं गेलं आहे. तर ५९६, १२६ लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. 

Web Title: Hilarious truth behind this viral engagement photo will make you say Aww nails not ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.