८४ वर्षाच्या वृद्धाने लग्नासाठी दिलेली जाहिरात सोशल मीडियात व्हायरल, म्हणाल माणूस आहे की, गाडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 11:57 IST2019-07-22T11:56:35+5:302019-07-22T11:57:15+5:30

वृत्तपत्रांमध्ये वर पाहिजे किंवा वधू पाहिजे अशा जाहिराती असणं सामान्य बाब आहे. अनेकदा तुम्हीही या जाहिराती पाहिल्या असतील किंवा तुम्हीही जाहिरात दिली असेल.

Hilarious matrimonial advt of 84 year old man goes viral | ८४ वर्षाच्या वृद्धाने लग्नासाठी दिलेली जाहिरात सोशल मीडियात व्हायरल, म्हणाल माणूस आहे की, गाडी?

८४ वर्षाच्या वृद्धाने लग्नासाठी दिलेली जाहिरात सोशल मीडियात व्हायरल, म्हणाल माणूस आहे की, गाडी?

वृत्तपत्रांमध्ये वर पाहिजे किंवा वधू पाहिजे अशा जाहिराती असणं सामान्य बाब आहे. अनेकदा तुम्हीही या जाहिराती पाहिल्या असतील किंवा तुम्हीही जाहिरात दिली असेल. या जाहिरातींमध्ये मुली किंवा मुलांची नोकरी, शिक्षण, उंची, बांधा, कमाई अशी माहिती दिली जाते. तसेच संपर्कासाठी नंबरही दिलेला असतो. पण सध्या लग्नाची एक अशी जाहिरात व्हायरल होत आहे, जी वाचून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल. 


एका ८४ वर्षांच्या वृद्ध व्यक्तींनी ही जाहिरात दिली असून यात त्यांनी त्यांची फारच विचित्र माहिती दिली आहे. जाहिरातीनुसार, या वृद्ध व्यक्तीकडे ३ कोटी रूपये किंमतीचं घर आहे. तसेच ते धुम्रपान करत नाही. इतकेच नाही तर त्यांच्याकडे ५ लाख रूपयांचं फिक्ड डिपॉझिटही आहे.




त्यांनी जाहिरातीत माहिती दिली की, ते मांस खात नाहीत आणि पूर्णपणे शाकाहारी आहेत. ते एक योगा टिचर आहेत. इतकेच नाही तर यात आणखी एक विचित्र माहिती म्हणजे त्यांचे कान, डोळे, दात आणि गुडघे ठीक काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.


सध्या ही जाहिरात सोशल मीडियात चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. लोक यावरून गमतीदार प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title: Hilarious matrimonial advt of 84 year old man goes viral