नशेत तर्रर्र असलेल्या बॉयफ्रेंडला खांद्यावर उचलून थेट घरी गेली गर्लफ्रेंड, Video जोरदार व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 16:12 IST2023-01-08T16:10:15+5:302023-01-08T16:12:55+5:30
बॉयफ्रेंड दारूच्या नशेत होता, त्यामुळे गर्लफ्रेंड त्याला उचलून घरी घेऊन जाते.

नशेत तर्रर्र असलेल्या बॉयफ्रेंडला खांद्यावर उचलून थेट घरी गेली गर्लफ्रेंड, Video जोरदार व्हायरल
एका कपलच्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी तिच्या बॉयफ्रेंडला खांद्यावर उचलून घेऊन जाताना दिसत आहे. बॉयफ्रेंड दारूच्या नशेत होता, त्यामुळे गर्लफ्रेंड त्याला उचलून घरी घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. हा व्हिडिओ टिकटॉकवर आतापर्यंत 40 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. nypost.com च्या रिपोर्टनुसार, ही घटना न्यू ईअरच्या संध्याकाळची आहे.
एक तरुणी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पार्टीला गेली होती. मात्र प्रियकर इतका नशेत होता की त्याला चालणेही कठीण झाले. अशा स्थितीत मुलीने त्याला खांद्यावर उचलले. मुलीला पाहिल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या कपलचा 11 सेकंदांचा व्हिडीओ पहिल्यांदा टिकटॉकवर अपलोड करण्यात आला होता. जिथे याला 4 मिलियन (40 लाख) व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, व्हिडिओमध्ये लोकेशनचा खुलासा करण्यात आलेला नाही.
Hero woman carries drunk, stumbling boyfriend home on her back in viral video https://t.co/nzdI2bTyedpic.twitter.com/2xyCQ7BxHF
— New York Post (@nypost) January 6, 2023
हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. यावर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी गंमतीने म्हणाले – अशी मैत्रीण मिळणे अवघड आहे, तर कुणी म्हणाले – की जोडीदार असावा तर असा. त्याचबरोबर काही युजर्सनी हा व्हिडीओ प्रँक असल्याचं सांगितलं आहे.
व्हिडीओमध्ये ती मुलगी तिच्या प्रियकराला खांद्यावर घेऊन कशी चालली आहे हे दिसत आहे. प्रियकराच्या जास्त वजनामुळे ती मधेच त्याला सांभाळून घेऊन जात आहे. आजूबाजूला लोक येत-जात तिच्याकडे बघत असतात. तर काही जण याचा व्हिडीओ काढतात. या घटनेची तुफान चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"