घरातील सोफ्याने घेतला ११ महिन्याच्या मुलाचा जीव; आई म्हणाली, काही क्षणातच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 14:38 IST2022-11-09T14:37:41+5:302022-11-09T14:38:48+5:30
काही सेकंदच मी माझ्या मुलापासून लांब गेले आणि दुसऱ्याच क्षणी जे काही घडले त्याने मला आयुष्यभर पश्चाताप होत आहे असं आई म्हणाली.

घरातील सोफ्याने घेतला ११ महिन्याच्या मुलाचा जीव; आई म्हणाली, काही क्षणातच...
आजकाल प्रत्येकाच्या घरात बसण्यासाठी सोफा असलेला आपण पाहिला असेल. मात्र या सोफ्याने ११ महिन्याच्या बाळाचा जीव घेतला असं सांगितले तर तुम्हालाही धक्का बसेल. अमेरिकेच्या लास वेगस इथे ह्दयद्रावक घटना घडली आहे जी कुठल्याही आई बापासाठी कायमचा धडा असेल. एका सोफ्यामुळे ११ महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेला ६ महिने झाल्यानंतर आईनं सोशल मीडियावर ही कहानी शेअर केली आहे.
या महिलेने सांगितले की, काही सेकंदच मी माझ्या मुलापासून लांब गेले आणि दुसऱ्याच क्षणी जे काही घडले त्याने मला आयुष्यभर पश्चाताप होत आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, २८ वर्षीय निकेला बेयरनं दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर ती एप्रिल महिन्यात एका मोठ्या घरात शिफ्ट झाली होती. काही सामानाचं अनपॅकिंग होते. घरात सगळीकडे सामान विखुरलेले होते. निकेला त्या सोफ्याचा उल्लेख करते तेव्हा तिच्या अंगावर काटा येतो. डोळे पाणावतात. मागील वर्षी त्यांनी एक इलेक्ट्रिक रेक्लाइनर सोफा खरेदी केला होता. त्याच्या समोरच्या बाजूला कंट्रोल करण्यासाठी बटण होते. ८ मे रोजीचा तो दिवस माझ्या आयुष्यातील काळा दिवस ठरला असं तिने म्हटलं.
वॉशरूमला गेली अन् सर्वकाही उद्ध्वस्त झालं
मुलाला सांभाळण्यासाठी निकेलाने जॉब सोडला होता. निकेलाचा दुसरा मुलगा राइडर खूप प्रेमळ मुलगा होता. काही दिवसांपूर्वीच तो चालायला शिकला होता. ८ मे दुपारी घरातील सगळी कामे संपल्यानंतर मी घराचे सर्व दरवाजे बंद करत होती. तेव्हा राइडरही तिथे होता. त्यानंतर मी वॉशरुमच्या दिशेने गेली. तेव्हा एखादं खेळणं पडल्याचं आवाज आला.
माझी मोठी मुलगी ऑब्रियाना राइडरला आवाज देत माझ्याकडे आली. तेव्हा आम्ही दोघं त्याला शोधायला लागलो. मी सर्व खोल्या पाहिल्या परंतु तो कुठेच सापडला नाही. त्यानंतर आईच्या मनात धाकधूक सुरू झाली. ती राइडरला जोरजोरात आवाज देऊ लागली. परंतु जसं मी रेक्लाइनर सोफ्याजवळ पोहचली तेव्हा समोरचं दृश्य पाहून धक्का बसला. राइडर सोफ्याच्या आत फसला होता. त्या भयानक आठवणी आजही डोळ्यात अश्रू आणतात. कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरलं नाही. निकेला मुलाच्या मृत्यूसाठी स्वत:ला जबाबदार धरते. ना रेक्लाइनर सोफा मी घरी आणला असता ना मुलासोबत अशी दुर्घटना घडली असती असं निकेला म्हणते.