डोळ्याची पापणी लवण्याआधीच पडला असता प्रेतांचा ढीग, त्याने पाहिलं आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 21:41 IST2021-07-13T21:39:45+5:302021-07-13T21:41:01+5:30
लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना हवाहवासा वाटणारा हा आकाशपाळणा जीवघेणाही ठरु शकतो. एका जत्रेत या आकाशपाळण्याने हाहाकार केला कित्येक जण या घटनेत मरता मरता वाचले...

डोळ्याची पापणी लवण्याआधीच पडला असता प्रेतांचा ढीग, त्याने पाहिलं आणि...
जत्रेतील आकाशपाळण्यांची मजा सर्वांनाच घ्यायला आवडते. लहान मुलं तर यासाठी आपल्या आईवडिलांकडे भरपूर हट्ट करतात. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना हवाहवासा वाटणारा हा आकाशपाळणा जीवघेणाही ठरु शकतो. एका जत्रेत या आकाशपाळण्याने हाहाकार केला कित्येक जण या घटनेत मरता मरता वाचले.
Bystanders at the Cherry Festival in Traverse City, Michigan rushed over to stop a carnival ride from tipping over https://t.co/OeE4sASyF6pic.twitter.com/ulLbxgQNRB
— philip lewis (@Phil_Lewis_) July 10, 2021
सध्या सोशलमिडियावर आकाश पाळण्याचा व्हिडिओ गाजतोय. यामध्ये असा काही थरारक क्षण आहे जो पाहुन तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. हा आकाशपाळणा व्यवस्थित चालता चालता अचानक उलट्या दिशेने चालू लागला. पाहणाऱ्यांच्या लक्षात आले काहीतरी अघटित घडत आहे. झुल्याने वेग घेतला व तो उलट सुलट फिरू लागला. पाहणाऱ्यांनी प्रसांगवधान दाखवत पाळण्यात बसलेल्या लोकांचे प्राण वाचवले.
मिशिगनमधल्या चेरीस फेअरमधली ही घटना आहे. घटनेचा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला. या घटनेचे दोन व्हिडिओ आहेत. त्यापैकी दुसरा व्हिडिओ अधिक थरारक आहे. पहिल्या व्हिडिओला ४ लाख तर दुसऱ्या व्हिडिओला ८ लाखांहुनही अधिक व्हिव्स मिळाले आहेत.