Hawk Attack Video: भयानक Video! कोंबडीशी पंगा घेतला, घारीला महागात पडला; पिल्लांच्या नादात जीव गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 14:26 IST2022-04-06T14:25:39+5:302022-04-06T14:26:00+5:30
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये घार कोंबडीची पिल्ले खाण्यासाठी झेपावते, परंतू त्यांना वाचविण्यासाठी कोंबडी घारीवर हल्ला करते. एवढा भयानक की काही झटापटीत ती घार कोंबडीच्या पायाखाली निपचित पडलेली असते.

Hawk Attack Video: भयानक Video! कोंबडीशी पंगा घेतला, घारीला महागात पडला; पिल्लांच्या नादात जीव गेला
घारीला जगातील सर्वात शक्तीशाली आणि वेगवान शिकारी पक्षी मानले जाते. ही घार आकाशात जेव्हा उडते तेव्हा तिचा वेग हा 320 किमी प्रति तास असू शकतो. ती जेव्हा आकाशातून आपल्या शिकारीकडे झेपावते तेव्हा डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्याला उचलूनही नेऊ शकते. अशाच खतरनाक घारीला एक कोंबडी नडली आहे. हा झुंजीचा भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हा जगातील सर्वात धोकादायक पक्षी मानला जातो. तो सुमारे 6 किलो वजन उचलू शकतो आणि उडू शकतो. मासे, उंदीर, ससे आणि कोंबडीची शिकार करतो. तो लहान कोल्हा आणि हरणांचीही शिकार करतो, पण असा अचाट शक्तीच्या पक्ष्याची कोंबडी शिकार करू शकते, हे जरा अतिशोयक्तीचेच आहे. नाही का...
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये घार कोंबडीची पिल्ले खाण्यासाठी झेपावते, परंतू त्यांना वाचविण्यासाठी कोंबडी घारीवर हल्ला करते. एवढा भयानक की काही झटापटीत ती घार कोंबडीच्या पायाखाली निपचित पडलेली असते.
कोंबडीच्या अचानक हल्ल्यामुळे घार उडू शकत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कोंबडी पायाने पकडून घारीला चोचीने एवढी मारते की घारीला आपला जीव गमवावा लागतो. व्हिडिओ खूपच आश्चर्यकारक आहे. हा व्हिडिओ नेचरगोएसमेटल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओला हजारो लोकांनी लाइक केले आहे.