शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! कधीही न कर्ज घेतलेल्या चहावाल्याला बँकेने ठरवलं ५० कोटींचा कर्जबाजारी; अन्.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 13:29 IST

बँकेशी निगडीत व्यवहार आपला आयुष्यातील एक महत्वाचा घटक आहे.  रोज अनेक लोक बँकेशी जोडलेले हजारो व्यवहार करतात. अनेकदा बँक, ...

बँकेशी निगडीत व्यवहार आपला आयुष्यातील एक महत्वाचा घटक आहे.  रोज अनेक लोक बँकेशी जोडलेले हजारो व्यवहार करतात. अनेकदा बँक, कर्ज, हफ्ते डोकेदुखीचं कारण ठरतात.  हरियाणातील कुरुक्षेत्रमध्ये अशी एक घटना समोर आली आहे. ही घटना वाचून तुम्ही नक्कीच विचारात  पडाल.  एका चहा विक्रेत्याला बँकेने  ५० कोटी रुपयांचं डिफॉल्टर घोषित केले आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल चहावाल्याने एवढं लोन खरचं घेतंल असेल का? तुमचा विश्वास बसणार नाही पण हे ऐकून या चहावाल्याची झोप उडाली आहे. हे डिफॉल्टर पाहून चहावाल्यानं 'मी कधी लोन घेतलंच नाही' अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार या चहा वाल्याचे नाव राजकुमार असं आहे. राज कुमारने सांगितले की, ''मी बँकेत कर्ज घेण्यासाठी निवेदन दिले होते. कोरोनाच्या संकटकाळात माझी आर्थिक स्थिती खूपच खालावली होती. तरिही बँकेने कर्ज देण्यास नकार दिला आणि माझ्यावर आधीच ५० कोटींच कर्ज असल्याचे कारण सांगितले. पण हे कसं शक्य आहे. कारण मी आत्तापर्यंत कर्ज  घेतलेलं नाही. '' 

राजकुमार हरिणायातील कुरुक्षेत्रमध्ये आपलं चहाचं दुकान लावतात.  यातून मिळत असलेल्या कमाईतून ते आपलं घर चालवतात.  कोरोनाच्या माहामारीत त्यांच्या या धंद्याचं खूप नुकसान झालं. त्यामुळे या चहावाल्या गृहस्थाची आर्थिक स्थिती खूपच बिकट होती.  पैशांची कमतरता भासल्याने त्यांनी बँकेतून कर्ज काढण्यासाठी निवेदन देले पण डिफॉल्टर बनवून बँकेने या चहावाल्याचे निवेदन नाकारले. 

दरम्यान कोरोनाच्या माहामारीत जगभरातील लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन केल्यामुळे अनेकांचे कामधंदे जवळपास दोन ते तीन महिने बंद होते. अशा स्थितीत लोकांकडचे पैसै संपल्याने कोरोनाचा प्रसार आणून आपापले कामधंदे कधी सुरू होतील याची सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे. अशा स्थितीत हरियाणातील या घटनेने मात्र बँकेच्या व्यवहारांवर आणि कार्यपद्धतींवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे.

सेल्यूट! २४ तासांची शिफ्ट केलेल्या डॉक्टरच्या चेहऱ्याची अवस्था पाहून तुम्हीही ठोकाल सलाम 

त्रिवार सलाम! भर पावसात अडकली रिक्षा; संकटकाळात खाकीतल्या देवदूताने केली रक्षा

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके