सेल्यूट! २४ तासांची शिफ्ट केलेल्या डॉक्टरच्या चेहऱ्याची अवस्था पाहून तुम्हीही ठोकाल सलाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 05:50 PM2020-07-21T17:50:06+5:302020-07-21T17:57:29+5:30

हा फोटो पाहून सोशल मीडिया युजर्स भावूक झाले आहेत.

Doctor photo viral after completing covid 19 shift with mark on face | सेल्यूट! २४ तासांची शिफ्ट केलेल्या डॉक्टरच्या चेहऱ्याची अवस्था पाहून तुम्हीही ठोकाल सलाम 

सेल्यूट! २४ तासांची शिफ्ट केलेल्या डॉक्टरच्या चेहऱ्याची अवस्था पाहून तुम्हीही ठोकाल सलाम 

Next

कोरोनाकाळात डॉक्टरर्स अत्यंत महत्वाची भुमिका बजावताना दिसून येत आहेत.  गेल्या दोन ते तीन महिन्यात आरोग्य सेवेतील कर्मचारी, पोलीस तसंच इतर अत्यावश्यक सेवेतील सेवतील कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. संकटकाळात कोणासाठी अन्नदाता  तर कोणासाठी देवदूत म्हणून पोलिसांनी आणि तसंच आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गाने मदतीचा हात दिला आहे. सोशल मीडियावर सध्या एका डॉक्टरचा फोटो व्हायरल होत आहे.

जगभरातील सर्वच कोरोनाबाधित देशांमधील डॉक्टर  २४ तास काम करत आहेत. पाकिस्तानमधील एका डॉक्टरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल असून हा फोटो या महिला डॉक्टरने आपली शिफ्ट संपल्यानंतर टाकला होता. या फोटोमध्ये या महिला डॉक्टराच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून त्यांचे परिश्रम,  त्यांची मेहनत सारं काही दिसून येत आहे. सतत मास्क लावल्यामुळे चेहऱ्यावर असे व्रण उमटले आहेत. हा फोटो बी नुसरत या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 

सोशल मीडियावर या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या फोटोवर डॉक्टरने, “माझी कोव्हिड-19 मधली शिफ्ट संपल्यानंतर मला कदाचित नवीन चेहऱ्याची गरज भासेल”, असे कॅप्शन दिले आहे. या फोटोने  सोशल मीडिया युजर्स भावूक झाले आहेत. त्यांनी कमेंट्च्या माध्यमांतून डॉक्टरांप्रती मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. या फोटोला आत्तापर्यंत ४० हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. धर्माच्या पलिकडे जाऊन कार्य केलेल्या डॉक्टरचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बोंबला! लॉकडाऊनमध्ये बटर चिकन खाण्यासाठी बाहेर पडणं पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला इतक्या लाखांचा दंड!

मोठं यश! चक्क कचऱ्यापासून तयार केलं हॅंड सॅनिटायजर, ५ वर्षांपासून प्रयत्नात होती महिला वैज्ञानिक

Web Title: Doctor photo viral after completing covid 19 shift with mark on face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.