गुणरत्न सदावर्तेंनी पाळलंय चक्क गाढव; सोशल मीडियावर 'मॅक्स'चे फोटो तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 15:14 IST2022-04-18T15:12:53+5:302022-04-18T15:14:56+5:30

वकील सदावर्तेंच्या गाढवाची सोशल मीडियावर चर्चा

gunratn sadavarte daughter zen photos viral on social media with donkey max | गुणरत्न सदावर्तेंनी पाळलंय चक्क गाढव; सोशल मीडियावर 'मॅक्स'चे फोटो तुफान व्हायरल

गुणरत्न सदावर्तेंनी पाळलंय चक्क गाढव; सोशल मीडियावर 'मॅक्स'चे फोटो तुफान व्हायरल

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे वकील गुणरत्न सदावर्तेंचं नाव चर्चेत राहिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्ते सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत. सदावर्तेंचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. बोलण्याची खास शैली, मिमिक्री यामुळे बऱ्याचदा सदावर्ते 'मीमकऱ्यांना' कंटेट पुरवतात. पोलिसांनी अटक केल्यानं अडचणीत आलेले सदावर्ते आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. 

सध्या सोशल मीडियावर सदावर्तेंच्या गाढवाची चर्चा आहे. सदावर्तेंची मुलगी झेनचा पाळीव गाढवासोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. या गाढवाचं नाव मॅक्स असं आहे. मॅक्स सदावर्तेंच्या प्रत्येक आनंदात सहभागी होतो. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर या मॅक्सला पेढे भरवण्यात आले होते. या क्षणांचे फोटो सदावर्तेंच्या पत्नी जयश्री यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत. त्यामुळे सदावर्तेंचं गाढव सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

सदावर्तेंची मुलगी झेनचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ती कार चालवत असताना दिसत आहे. झेनचं वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे. त्यामुळे नियमानुसार तिला वाहन चालवण्याची परवानगी नाही. त्यामुळेच झेनविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. 

Web Title: gunratn sadavarte daughter zen photos viral on social media with donkey max