शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये नवरदेवाचा जुगाड, मक्याच्या शेतातून काढली वरात; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 11:45 IST

viral video : लॉकडाऊनमध्ये पोलीस कारवाई करतील, या भीतीपोटी काहीजण लपून लग्नकार्य करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत हा व्हिडिओ ३१ हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अनेक राज्यांत सध्या लॉकडाऊन सुरू केला आहे. यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, अशा परिस्थिती ज्यांच्या घरी लग्नकार्य आहे. अशा कुटुंबीयांना तर मोठा फटका सहन करावा लागत आहे. तर काही लोकांनी लग्नकार्य पुढे ढकलले आहे. (groom did jugaad, marriage procession taken out in farm internet loves it see viral video)

दुसरीकडे, काही लोक लॉकडाऊनमध्ये कमी पाहुण्यांच्या उपस्थित लग्नकार्ये उरकून घेत आहेत. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पोलीस कारवाई करतील, या भीतीपोटी काहीजण लपून लग्नकार्य करताना दिसत आहेत. अशात एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ एका लग्नाच्या वरातीचा आहे. ज्यामध्ये वरात मक्याचे पीक असलेल्या शेतातून जात आहे. या वरातीत नवरदेव, बँड आणि पाहुणे दिसून येत आहेत. 

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओसोबत दीपांशु काबरा यांनी लिहिले आहे की, 'मजेशीर वरात'. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मक्याच्या शेतातून बँडसोबत नवरदेव येत आहे. तसेच, लहान मुले आणि महिला या वरातीत दिसत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ भरपूर लोकांनी पाहिला आहे. तसेच, अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ ३१ हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

("जगात नाचक्की! मोदींना राजकारणविरहित राष्ट्रवादाचा विचार करावा लागेल", शिवसेनेची खोचक टीका)

देशात गेल्या 24 तासांत 4,187 जणांचा मृत्यूकेंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार (Health Ministry of India) देशात गेल्या 24 तासांत देशात 4,01,078 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 3,18,609 बरे झाले आहेत. खळबळ उडविणारा आकडा हा मृतांचा आहे. देशात गेल्या 24 तासांत 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आजपर्यंत 2,18,92,676 कोरोनाबाधित साप़डले आहेत. यापैकी 1,79,30,960 बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 2,38,270 वर गेला आहे. सध्या देशात 37,23,446 रुग्ण उपचार घेत आहेत.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Viralसोशल व्हायरलmarriageलग्न