शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:42 IST

सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने नुसता धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा अक्षरशः थरकाप उडेल, पण तरीही तो पाहिल्याशिवाय तुम्हाला राहावणार नाही!

सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने नुसता धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा अक्षरशः थरकाप उडेल, पण तरीही तो पाहिल्याशिवाय तुम्हाला राहावणार नाही! अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडीओ जिगरबाज तरुणीच्या वेडेपणाचा पुरावा आहे, जो तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच देईल.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये एक अतिशय सुंदर तरुणी एका अक्राळविक्राळ धबधब्याच्या अगदी कडेला आरामात झोपलेली दिसते. हा काही साधासुधा धबधबा नाही. हा हजारो फूट खोल दरीत कोसळणारा एक जीवघेणा धबधबा आहे. दिसायला तो जेवढा नयनरम्य आहे, तेवढीच त्याची खळखळ ऐकून तुमची भीतीने गाळण उडेल. पाण्याचा प्रवाह इतका जोरात आहे की, जर चुकूनही पाय घसरला, तर थेट मृत्यूच्या दरीत कोसळायला होईल. आजूबाजूला सगळीकडे ओलसर, निसरडी जागा... पण आपल्या या दिलखुश तरुणीला कसलीच भीती वाटत नाही.

लाइक्ससाठी जीव धोक्यात?

व्हिडीओमध्ये दिसणारी ही तरुणी ना घाबरलेली आहे, ना ती कसली काळजी घेताना दिसत आहे. ती आरामात धबधब्याच्या टोकावर झोपली आहे, कॅमेऱ्याकडे पाहून क्यूट स्माईल देत आहे आणि अगदी आरामात रील शूट करून घेत आहे. हे बघून असं वाटतं की, तिला आपल्या जीवाची बिलकूल पर्वा नाही, तिच्यासाठी इन्स्टाग्रामवर मिळणारे लाइक्स आणि फॉलोअर्स जास्त महत्त्वाचे आहेत. व्हिडीओमधील धबधब्याचा आवाज, त्याची खोली आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज एवढा भीतीदायक आहे की, अनेकांनी तर व्हिडीओ अर्ध्यावरच बंद केला असेल. काही युझर्सनी याला "आतापर्यंतचे सर्वात भयानक रील" असं म्हटलंय. तर काहींनी, असे व्हिडीओ सोशल मीडियावर पसरवू नयेत, अशी मागणी केली आहे.

नेटकऱ्यांचा संताप, पण व्हिडीओ व्हायरल!

सोशल मीडियावरचा हा व्हिडीओ पाहून लोक चकित झाले आहेत आणि काहींचा रागाने अक्षरशः तिळपापड झाला आहे. अनेक युझर्सनी या व्हिडीओवर आपला संताप व्यक्त केला आहे. काहींनी लिहिलं की, "एकदा जरी पाय घसरला असता, तर जीव गेला असता!" अनेकांनी याला वेडेपणा आणि मूर्खपणाचा कळस म्हटलंय. तर एका युझरने कमेंट केली की, "अशा लोकांची मानसिक तपासणी करायला हवी!" हा व्हिडीओ एक्सवर 'Sheetal2242' नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारो कमेंट्सचा पाऊस पडला आहे. लोक या तरुणीच्या स्टंटला बिनडोकपणा आणि बेजबाबदारपणा म्हणत आहेत.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके