बाबो! 'त्याला' झाली इतकी गरमी की नग्न होऊन चालवत होता गाडी, पोलिसही अडवू शकले नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 15:58 IST2019-06-27T15:56:42+5:302019-06-27T15:58:57+5:30
सध्या गरमीमुळे सगळ्याचे हाल कसे बेहाल होत आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. पण काय करणार गरमी सहन करण्यापलिकडे पर्याय नाही.

बाबो! 'त्याला' झाली इतकी गरमी की नग्न होऊन चालवत होता गाडी, पोलिसही अडवू शकले नाहीत!
सध्या गरमीमुळे सगळ्याचे हाल कसे बेहाल होत आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. पण काय करणार गरमी सहन करण्यापलिकडे पर्याय नाही. सामान्यपणे गरमी झाल्यावर लोक काय करतात तर फॅनखाली बसतात, कुलर-एसी लावतात, फार फार तर कमी कपडे घालतात. पण एका व्यक्तीने गरमी होत असल्याने असा काही कारनामा केला की, तुम्ही असं काही करण्याची कधी कल्पनाही करू शकत नाही.
नॉर्थ-इस्ट जर्मनीतील या घटनेने सर्वांना हैराण करून सोडलं आहे. इथे एका व्यक्तीला एवढी गरमी झाली की, त्याने अंगावरचे सगळे कपडे काढला आणि तो नग्न झाला. केवळ सॅंडल आणि हेल्मेट घालून तो स्कूटी चालवत बाहेर पडला.
Weil wir #sprachlos sind 😅: Wie würden Sie dieses Bild betiteln?
— Polizei Brandenburg (@PolizeiBB) June 26, 2019
Als kleine Inspirationshilfe - ein #Zitat des Herren: „Et is halt warm, wa?“
Und jetzt Sie!#Hitze#safetyfirst#LebenAmLimitpic.twitter.com/BiM27ydDEy
जर्मनीमध्ये सध्या तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्यावर आहे. असं बोललं जात आहे की, १९४७ नंतर पहिल्यांदाच इतकं तापमान वाढलं. त्यामुळे येथील लोक हैराण झाले आहेत. अशात ही नग्न झाली आणि पोलिसही पोहोचले. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याला गरमी होत आहे. त्यामुळे त्याने असं केलं.
या व्यक्तीने कपडे काढले आणि स्कूटी चालवू लागला. मजेदार बाब ही आहे की, पोलिसांनीही त्याला रोखलं नाही. पोलिसाही म्हणाले की, अशात तो तरी काय करणार?