गजब का टॅलेंट! लग्नात तरुणीचा जबरदस्त कारनामा केला, व्हिडिओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 15:42 IST2022-11-23T15:40:03+5:302022-11-23T15:42:06+5:30
सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे, आणि सोशल मीडियावरही लग्नाच्या मिरवणुकीच्या मनोरंजक व्हिडिओंचा पूर आला आहे. काही व्हिडिओ क्लिप मजेदार आहेत.

गजब का टॅलेंट! लग्नात तरुणीचा जबरदस्त कारनामा केला, व्हिडिओ झाला व्हायरल
सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे, आणि सोशल मीडियावरही लग्नाच्या मिरवणुकीच्या मनोरंजक व्हिडिओंचा पूर आला आहे. काही व्हिडिओ क्लिप मजेदार आहेत, तर काही हृदयस्पर्शी आहेत. सध्या सोशल मीडियावर एका लग्नातील एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
लग्न सोहळ्यात अनेक भन्नाट मजेदार घटना घडत असतात. लग्नाचा पोशाख परिधान केलेल्या तरुणीने 'कबडी वाले' असा आवाज काढला आहे, यावेळीची तिची स्टाइल इंटरनेटवर व्हायरल झाली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही.
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम युजर saloni_sandhu1 ने 20 ऑक्टोबर रोजी पोस्ट केला, आतापर्यंत या व्हिडिओला 1 कोटी 43 लाख व्ह्यूज, 7 लाख 75 हजार लाईक्स आणि 2.5 हजारांहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.या व्हिडिओत एक तरुणी लग्नाचा पोशाख परिधान केलेल्या कपड्यांच्या सेल्समनचे नाटक करत आहे. त्यानंतर व्हिडिओ चित्रित करणारी व्यक्ती म्हणते – कबडी वाला भी. यानंतर मुलगी मोठ्याने कबड्डी वाला ओरडते, जे ऐकून अनेकांना हसू आवरत नाही. एका युजरने लिहिले की – दीदीमध्ये कमालीचे टॅलेंट आहे.