सोशल मीडियावर एक प्यारवाली लव्हस्टोरी तुफान व्हायरल होत आहे. फ्रान्सची एक तरुणी भारत फिरायला आली होती. याच दरम्यान तिची भेट एका स्थानिक रिक्षा चालकाशी झाली. साध्या संभाषणातून सुरू झालेली ही ओळख आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलली. भाषा, संस्कृती आणि देश वेगळे असूनही त्यांच्या भावनांची भाषा एकच होती. या कथेत कोणताही बडेजाव किंवा दिखावा नसून, साधेपणा आणि खरे प्रेम आहे, म्हणूनच ही गोष्ट लोकांच्या मनाला भिडत आहे.
X (ट्विटर) वरील @venom1s या अकाउंटवरून शेअर केलेल्या एका मिनिटाच्या व्हिडिओने सर्वांची मनं जिंकली आहेत. या व्हिडिओमध्ये कपलच्या फोटोंसह माहिती दिली आहे की, तो तरुण जयपूरमध्ये एक सामान्य रिक्षा रिक्षा चालक होता. त्याची परिस्थिती तेव्हा बदलली जेव्हा फ्रान्सची 'सारा' त्याच्या ऑटोमध्ये बसली. सारा युरोपमधून भारत बघायला आली होती आणि त्या तरुणाने सुमारे दोन आठवडे आपल्या रिक्षाने तिला पूर्ण जयपूर फिरवलं. या दिवसांत त्यांच्यातील संवाद, विश्वास आणि मैत्री वाढत गेली. ही मैत्री हळूहळू अशा प्रेमात रूपांतरित झाली.
जेव्हा सारा युरोपला परतली, तेव्हा दुरावा जाणवू लागाल. पण रोजच्या तासनतास चालणाऱ्या संवादाने त्यांचे नाते अधिक घट्ट केले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला, पण हा मार्ग सोपा नव्हता. साराच्या कुटुंबाने या नात्याला विरोध केला, कारण तरुण १० वी नापास होता आणि व्यवसायाने रिक्षा चालक. याच कारणामुळे त्याचा फ्रान्सचा व्हिसा अनेकदा नाकारण्यात आला. हा काळ त्यांच्यासाठी सर्वात मोठी परीक्षा होती, पण त्यांच्या संयमाने आणि विश्वासाने त्यांची साथ सोडली नाही.
अनेक प्रयत्नांनंतर तो तरुण फ्रान्सला पोहोचण्यात यशस्वी झाला आणि दोघांनी लग्न केलं. आज हे जोडपे दिवाळी आणि ख्रिसमस दोन्ही सण एकत्र साजरे करतात. व्हिडिओमध्ये तरुण लिहितो, "लोक म्हणायचे की ती तुला सोडून देईल, पण १३ वर्षांनंतरही ती माझ्यासोबत आहे." आज त्यांचा एक छोटासा सुखी संसार असून त्यांना दोन गोंडस मुलं आहेत. ही केवळ एक व्हायरल व्हिडिओची गोष्ट नसून आशा, जिद्द आणि खऱ्या प्रेमाचं एक उत्तम उदाहरण आहे.
Web Summary : A French tourist in Jaipur fell in love with a rickshaw driver. Despite cultural differences and family opposition, they married and now have two children, proving true love prevails.
Web Summary : जयपुर में एक फ्रांसीसी पर्यटक को एक रिक्शा चालक से प्यार हो गया। सांस्कृतिक मतभेदों और पारिवारिक विरोध के बावजूद, उन्होंने शादी कर ली और अब उनके दो बच्चे हैं, यह साबित करते हुए कि सच्चा प्यार प्रबल होता है।