गल्ली क्रिकेट खेळताना चेंडू छतावर जाऊ दे किंवा नाल्यामध्ये... खेळाडू काहीही करून चेंडू मिळवतातच. मात्र जर का चेंडू मगरीच्या शेपटीवर पडला तर? नक्कीच, कुणीही तो चेंडू आणण्यास जाणार नाही. मात्र अमेरिकेतील दोन गोल्फपटूंनी चेंडू मिळविण्यासाठी हा वेडेपणा केला. सध्या त्यांच्या याच वेडेपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. काईल डाऊन्स नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.
VIDEO: चेंडूसाठी काहीपण! 'तो' मगरीच्या शेपटीजवळ गेला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:55 IST