Video : आकाशात दिसला रहस्यमय प्रकाश; लोक म्हणाले, हे तर एलियन्सचं विमान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 13:03 IST2019-10-07T12:57:45+5:302019-10-07T13:03:51+5:30
अलिकडे नेहमीच आकाशात उडत्या तबकड्या दिसल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. पुन्हा एकदा अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये लोकांनी आकाशात काही विचित्र गोष्टी बघितल्या.

Video : आकाशात दिसला रहस्यमय प्रकाश; लोक म्हणाले, हे तर एलियन्सचं विमान!
अलिकडे नेहमीच आकाशात उडत्या तबकड्या दिसल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. पुन्हा एकदा अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये लोकांनी आकाशात काही विचित्र गोष्टी बघितल्या. विलियम गाय नावाच्या एका व्यक्तीने समुद्रावर आकाशात अनोखा प्रकाश पाहिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये त्यांना बोलतानाही ऐकू शकतो. ते हे नेमकं काय आहे? इथे बाजूबाजूला कुठेही जमीन नाही. तरिही हे काय दिसतंय?
नावेत असलेल्या इतर लोकही काही बोलत आहेत. ते म्हणताहेत की, अशाप्रकारची घटना केवळ टीव्हीवरच बघायला मिळते. नॉर्थ कॅरोलिनाच्या समुद्रात शूट करण्यात आलेला हा व्हिडीओ विलियमने जवळपास एक आठवड्यापूर्वी यूटयूबवर अपलोड केला होता. आता हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिलाय.
व्हिडीओवर काही कमेंटमध्ये लोक म्हणाले की, या तबकड्या होत्या. तर काही लोक म्हणताहेत हा केवळ अनोका प्रकाश होता.
तबकड्यांच्या असण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पण गेल्याच आठवड्यात तबकड्यांचे तीन व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. हा व्हिडीओ खरा असल्याचंही अमेरिकन नेव्हीने मान्य केलं होतं.