Fish with a human face spotted in a lake in china watch viral video | Video : 'मनुष्यासारखा चेहरा' असलेला मासा पाहून लोक झाले हैराण, व्हिडीओ व्हायरल...

Video : 'मनुष्यासारखा चेहरा' असलेला मासा पाहून लोक झाले हैराण, व्हिडीओ व्हायरल...

आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या रंगाचे मासे पाहिले असतील. पण कधी मनुष्यासारखा चेहरा असलेला मासा तुम्ही पाहिलाय का? याचं उत्तर नाही असंच असेल. पण चीनमध्ये एक असाच मासा आढळून आला आहे. या माशाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून लोक हे बघून हैराण झाले आहेत. 

दक्षिण चीनच्या एका गावात एक महिला टुरिस्टला मनुष्यासारखा चेहरा असलेला मासा आढळला. तिने या माशाचा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियात शेअर केला. हा व्हिडीओ पाहून यावर लोकांना विश्वास ठेवणं कठीण होत आहे. कारण अशाप्रकारचं काही त्यांनी याआधी कधी पाहिलं नाही.

हा व्हिडीओ ट्विटर यूजर @Unexplained ने शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ५ लाखांपेक्षा व्ह्यूज, ४५६९ रिट्विट आणि १६, ०९१ पेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. 


वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fish with a human face spotted in a lake in china watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.