शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

मछली जल की रानी! पण या माशाने तर चक्क चालवली कार, विश्वास बसत नसेल तर पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 19:55 IST

माशाला तर हातपाय नसतात, फक्त परच असतात. अशात मासा ड्रायव्हिंग करणं शक्यच नाही (Fish driving video), असंच तुम्ही म्हणाल. पण आपल्याला अशक्य वाटणारी ही गोष्ट माशाने मात्र प्रत्यक्षात करून दाखवली आहे.

मासा म्हणजे जलचर (Fish video). जो फक्त पाण्यात पोहोतो हे आपल्याला माहिती आहे. त्याला हातपाय नसतात तर फक्त पर असतात. आता ड्रायव्हिंग किंवा गाडी चालवणं म्हटलं तर त्यासाठी हात आणि पायांची गरज पडते. माशाला तर हातपाय नसतात, फक्त परच असतात. अशात मासा ड्रायव्हिंग करणं शक्यच नाही (Fish driving video), असंच तुम्ही म्हणाल. पण आपल्याला अशक्य वाटणारी ही गोष्ट माशाने मात्र प्रत्यक्षात करून दाखवली आहे.

एका गोल्डफिशने चक्क ड्रायव्हिंग केली आहे (Goldfish Drives Car). पाण्यात आपला मार्ग शोधणाऱ्या या माशाने (Fish Navigation System) रस्त्यावरही कार चालवून दाखवली आहे. पहिल्यांदाच एका माशाने ऑपरेटेड व्हिकल चालवलं आहे (fish operated vehicle). इस्राइलच्या बेन गुरियॉन युनिव्हर्सिटीच्या (Ben-Gurion University in Beersheba, Israel) शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला. बिहेवेरिअल ब्रेन रिसर्च जर्नलमध्ये (Behavioural Brain Research Journal) हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

शास्त्रज्ञांनी एक रोबोटिक कार (Robotic Car)  बनवली होती. या कारच्या वर काचेचा एक टँक होता, ज्यात पाणी होतं. त्यामध्ये एक गोल्ड फिश ठेवण्यात आला. माशाच्या तोंडाची दिशा समजण्यासाठी एक लाईडारही इम्प्लांट करण्यात आला होता, जो कॉम्प्युटरला जोडण्यात आला होता. लाइडारच्या खालीच एक कॅमेरा होता, जो माशाच्या तोंडाची दिशा ओळखून कॉम्प्युटरला सांगत होता. मासा जिथं आपलं तोंड फिरवायचा त्या दिशेने रोबोटिक कारही वळायची.

प्राण्यांच्या नेव्हिगेशन सिस्टमला समजून घेणं हाच या अभ्यासाचा उद्देश होता. या प्रयोगात गोल्डफिशाला त्याचा खाणं नेव्हिगेट करण्यासाठी सोडण्यात आलं होतं. दिशा बदलत, थोडं गोंधळत अखेर तो आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचला. या प्रक्रियेता त्याला 2 मिनिटांचा कालावधी लागला. प्रयोगात मासा एका एक्वेरिअममध्ये बसून ज्या दिशेला पाहत होता किंवा ज्या दिशेला पोहोत होता त्याच दिशेला कार जात होती.  या पद्धतीच्या प्रयोगाने मासे जमीन किंवा कोणत्याही ठिकाणी कार ड्राइव्ह करू शकतात. माशानंतर आता इतर प्राण्यांवरही हा प्रयोग केला जाणार आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर