शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

VIDEO: उत्तर प्रदेशच्या रस्त्यावर 'आईन्स्टाईन' दिसला; तुफान हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 11:04 AM

बागपतच्या मुख्य मंडईत दोन दुकानदारांमध्ये वाद; दोन गटांमध्ये जबर हाणामारी

एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेश बाबू, हा प्रसिद्ध डायलॉग तुम्ही ऐकला असेल. पण उत्तर प्रदेशातल्या बागपतमध्ये घडलेला प्रकार पाहून तुम्ही कदाचित 'एक प्लेट चाट की किमत तुम क्या जानो' असं म्हणाल. कारण एका चाटवरून बागपतमधील एका मंडईत अगदी फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. दोन दुकानदारांमध्ये झालेल्या हाणामारीत नंतर अनेकांची एंट्री झाली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं. बागपतच्या मंडईतील हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.बागपतमधील बडौत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दोन चाट दुकानदारांचा सोमवारी वाद झाला. एका दुकानदारानं दुसऱ्या दुकानात जाणाऱ्या ग्राहकाला स्वत:कडे बोलावल्यानं वादाला सुरुवात झाली. त्यानंतर परिसराचं रुपांतर युद्धभूमीत झालं. या संपूर्ण हाणामारीत प्रमुख भूमिकेत दिसलेल्या काकांच्या हेअर स्टाईलची तुलना अनेकांनी विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईनच्या हेअर स्टाईलशी केली आहे.  शाब्दिक वादाचं रुपांतर हाणामारीत होताच दोन्ही गट एकमेकांवर लाठ्या, काठ्या घेऊन तुटून पडले. दोन्ही गटांनी तुफान हल्ला चढवला. या हाणामारीच्या व्हिडीओमध्ये हिरव्या रंगाचा कुर्ता घातलेली आणि मोठे केस असलेली एक व्यक्ती दिसत आहे. त्यांनी अनेकांची धुलाई केली आहे. काही जणांनी त्यांनादेखील मारहाण केली आहे. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीच्या हेअर स्टाईलची जोरदार चर्चा झाली. या व्यक्तीचं नाव हरेंद्र आहे.

हरेंद्र बागपतच्या मुख्य मंडईत चाटचं दुकान चालवतात. त्यांचं दुकान ४०-५० वर्षे जुनं आहे. 'एक-दोन महिन्यांपूर्वी माझ्या दुकानासमोर आणखी एक चाटचं दुकान सुरू झालं. माझ्या दुकानात शिळ्या पदार्थांपासून चाट तयार केला जातो, असं सांगून समोरचा दुकानदार ग्राहकांना स्वत:च्या दुकानात नेतो. याला मी विरोध करताच समोरील दुकानदार मारहाण करतो,' असं हरेंद्र यांनी सांगितलं.मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हरेंद्र यांच्यासह ८ जणांना ताब्यात घेतलं. सोशल मीडियावर हरेंद्र यांच्या 'आईन्स्टाईन लूक'ची चर्चा आहे. याबद्दल विचारणा केली असता आपण साईबाबांचे भक्त असून दररोज साईबाबांची पूजा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन वर्षांतून एकदाच केस कापतो. हरिद्वारला जाऊन केसांना कात्री लावतो, अशी माहिती हरेंद्र यांनी दिली.