FIFA World Cup 2022: हद्दच झाली! वर्ल्ड कपचे Live रिपोर्टिंग करताना महिला पत्रकारासोबत घडला विचित्र प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 04:39 PM2022-11-22T16:39:22+5:302022-11-22T16:44:34+5:30

महिला रिपोर्टर कॅमेऱ्यासमोर बोलत होती अन् त्याच वेळी...

Female Journalist reporter robbed in fifa world cup 2022 in front of live camera coverage in Qatar | FIFA World Cup 2022: हद्दच झाली! वर्ल्ड कपचे Live रिपोर्टिंग करताना महिला पत्रकारासोबत घडला विचित्र प्रकार

FIFA World Cup 2022: हद्दच झाली! वर्ल्ड कपचे Live रिपोर्टिंग करताना महिला पत्रकारासोबत घडला विचित्र प्रकार

Next

FIFA World Cup 2022, Female Reporter Robbed: कतारमध्ये सुरू असलेल्या FIFA World Cup 2022 चे कव्हरेज करताना एका महिला पत्रकाराला लुटण्यात आल्याचा दावा केला जात आहे. अर्जेंटिनाच्या एका महिला पत्रकाराने हा आरोप केला आहे. डॉमिनिक मेट्झगर (Dominique Metzger) नावाची पत्रकार थेट प्रक्षेपणात (Live Coverage) व्यस्त असताना तिची हँडबॅग चोरीला गेली. यानंतर तिने पोलिसांकडे जाऊन मदत मागितली. मिररच्या रिपोर्टनुसार, तिला पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्रतिसादाने आश्चर्याचा धक्काच बसला. हा संपूर्ण प्रकार सांगताना महिला पत्रकार म्हणाली, 'मी पोलीस स्टेशनला गेले आणि तिथे गेल्यानंतर आमच्यात काही मतभेद सुरू झाले. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने मला सांगितले की आमच्याकडे सर्वत्र हायटेक कॅमेरे आहेत आणि आम्ही चोरट्याचा चेहरा ओळखून शोध घेणार आहोत.'

लाइव्ह कव्हरेज दरम्यान घडला प्रकार

डॉमिनिक मेट्झगरने अधिक खुलासा मागितला तेव्हा पोलीस म्हणाले, 'तुम्हाला कोणत्या प्रकारचा न्याय हवा आहे? आम्ही त्याला शिक्षा करावी अशी तुमची इच्छा आहे? त्याला पाच वर्षांची शिक्षा व्हावी असे तुम्हाला वाटते का? त्याला हद्दपार करायचे आहे का?' असे उलट सवाल करत त्यांनीच महिलेला शांत बसण्यास भाग पाडले. डॉमिनिक मेट्झगर हिने तिच्या हरवलेल्या वस्तूंसाठी मदत करण्याची विनंती आपल्या देशाच्या संघालाही केली आहे. Marca.com च्या वृत्तानुसार, महिला पत्रकाराने टीव्हीवर तिचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, 'जेव्हा आम्ही थेट प्रक्षेपण करत होतो, तेव्हा त्यांनी माझी हँडबॅग चोरली. पोलिसांनी मला येथे तक्रार नोंदवण्यासाठी पाठवले. बॅगेत असलेली कागदपत्रे आणि कार्ड्स मला परत मिळायला हवीत. त्याची मला जास्त चिंता आहे. बाकीच्या गोष्टींची मला पर्वा नाही.'

सुरक्षेचा अभाव हा कतारमधील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा

कतारमध्ये सुरक्षेचा मुद्दा हा सर्वात चर्चेचा मुद्दा आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, कतारच्या टूर्नामेंट सुरक्षा समितीच्या अधिकाऱ्यांनी स्टेडियममधील गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यासाठी शेकडो पुरुषांना नियुक्त केले आहे. पण त्यापैकी काहींना या कामाचा अनुभवच नाही. सुरुवातीच्या सामन्यात, यजमान राष्ट्राने त्यांचा पहिला सामना इक्वेडोर विरुद्ध अल बायत स्टेडियमवर खेळला, परंतु कतारने हा सामना 0-2 ने गमावला आणि विश्वचषकातील पहिला सामना गमावणारा पहिला घरगुती संघ बनला. तेव्हाही काही अंशी गोंधळ झाल्याचे दिसले होते. दरम्यान कतारचा दुसरा सामना शुक्रवारी सेनेगलविरुद्ध होणार आहे.

Web Title: Female Journalist reporter robbed in fifa world cup 2022 in front of live camera coverage in Qatar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.