शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बापमाणूस! ऑनलाइन लेक्चर अटेंड करणाऱ्या मुलीवर वडलांनी धरले मायेचे छत्र  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 11:44 IST

Social Viral News: वडील आणि मुलगीचे नाते अगदी खास मानले जाते. बापलेकीच्या नात्यातील हे गहिरेपण अधोरेखित करणारा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

बंगळुरू - पित्याचे छत्र हा मुलांसाठी मोठा आधार असतो. त्यातही वडील आणि मुलगीचे नाते अगदी खास मानले जाते. बापलेकीच्या नात्यातील हे गहिरेपण अधोरेखित करणारा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो कर्नाटकमधील मलनाड परिसरातील सुलिया तालुक येथील आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती छत्री घेऊन ऊभी आहे. त्याखाली एक मुलगी ऑनलाइन क्लास अटेंड करताना दिसत आहे. पहिल्या नजरेत या मुलीच्या चिकाटीचे कौतुक वाटते. मात्र येथील मुलांसाठी शिक्षण किती कष्टप्रद आहे हे अधोरेखित होते. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. तर ऑनलाइन क्लास सुरू आहेत. त्यामुळे या ऑनलाइन क्लाससाठी इंटरनेट मिळवण्यासाठी मुलांना अनेक खटपटी कराव्या लागत आहेत. काही ठिकाणी मुले नेटवर्क असलेल्या ठिकाणी तंबू लावून बसत आहेत. तर काही ठिकाणी छत्रीखाली बसून मुले ऑनलाइन लेक्चर अटेंड करत आहेत.

हा फोटो महेस फुच्चापडी नावाच्या फोटोजर्नलिस्टने क्लिक केला आहे. त्यांनी सांगितले की, ही मुलगी दररोज संध्याकाळी चार वाजता एसएसएलसीच्या क्लाससाठी या ठिकाणी येते. सुलिया तालुलमधये राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ऑलनाइन शिक्षणादरम्यान, नेटवर्कसाठी उंच ठिकाणी जावे लागते. दरम्यान, या आठवड्यापासून इथे दक्षिण-पश्चिम मान्सून खूप सक्रिय झाला आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. खराब नेटवर्कमुळे मुलांना ऑनलाइन क्लाससाठी दुर्गम ठिकाणी जावे लागत आहे. काही विद्यार्थ्यांनी जिथे नेटवर्क मिळत आहे, अशा ठिकाणी टेंट लावले आहेत.

कोरोनाकाळात मुलांच्या शिक्षणासाठी ऑनलाइन क्लासचा पर्याय निवडण्यात आला आहे. मात्र ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांसाठी ऑनलाइन क्लासला हजर राहणे खूप कठीण जात आहे. कुठूनतरी स्मार्टफोनची व्यवस्था केली तरी खराब नेटवर्क त्यांच्यासाठी आव्हान ठरत आहे. केवळ विद्यार्थीच नाही तर वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करणाऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  

टॅग्स :Educationशिक्षणonlineऑनलाइनKarnatakकर्नाटकSocial Viralसोशल व्हायरल