Fact Check: रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी ॲप डाऊनलोड करा; मेसेजमागचं सत्य उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 03:01 PM2020-07-29T15:01:45+5:302020-07-29T15:02:13+5:30

व्हायरल मेसेजमध्ये ॲप डाऊनलोड करुन कोरोनामध्ये आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी रोज तपासा असा दावा करण्यात आलेला आहे.

Fact Check: Download app to check blood oxygen level; Reveal the truth behind the message | Fact Check: रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी ॲप डाऊनलोड करा; मेसेजमागचं सत्य उघड

Fact Check: रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी ॲप डाऊनलोड करा; मेसेजमागचं सत्य उघड

Next

मुंबई – कोरोना संकट काळात सध्या सायबर गुन्ह्याचं प्रमाण वाढलं आहे, दिवसेंदिवस कोरोना धोका बळावत असल्यानं लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. याचा फायदा घेऊन लोकांची फसवणूक करण्याचे धंदे काहींनी सुरु केलेत. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. यात रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी ॲप डाऊनलोड करण्यास सांगितलं जात आहे.

व्हायरल मेसेजमध्ये हे ॲप डाऊनलोड करुन कोरोनामध्ये आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी रोज तपासा असा दावा करण्यात आलेला आहे. मात्र रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याकरिता मोबाईल ॲप्स विश्वासाचं साधन नाही, या ॲप्सच्या वापर करणं घातक ठरु शकतं असा इशारा महाराष्ट्र सायबर क्राईमचे आयजी यशस्वी यादव यांनी दिला आहे.

तसेच हे ॲप डाऊनलोड करताना स्मार्टफोन युजरला मोबाईलमध्ये अन्य गोष्टींची परवानगी द्यावी लागते, ही परवानगी देणे युजर्सच्या प्रायव्हेसीसाठी धोक्याचे आहे. मोबाईलमधील डेटा चोरण्याचं काम ॲपच्या माध्यमातून केलं जाऊ शकते. व्हायरल होत असलेला मेसेज अर्धसत्य असून अद्याप कोणतंही ॲप रक्तातील ऑक्सिजन पातळी योग्यरित्या मोजू शकत नाही हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे युजर्सने अशा ॲप्सवर विश्वास ठेवणं धोकादायक आहे. कारण याची कार्यपद्धती मेडिकल पल्स Oximetry यंत्राद्वारे केलेल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याच्या पद्धतीसारखी नाही असंही यशस्वी यादव म्हणाले.

युजर्सने काय काळजी घ्यायला हवी?

कोणत्याही आरोग्यविषयक माहितीसाठी डॉक्टरांशी ऑनलाईन सल्लामसलत करावा.

हेल्थकेअर ॲपवरील माहिती बरोबरच असेल याची शाश्वती नाही, तसेच यातून डेटा चोरी करण्याचीही उद्धेश असू शकतो, त्यापासून सावध राहावं.

कोणतेही ॲप डाऊनलोड करताना त्याचे रेटिंग, रिव्ह्यू, हे तपासून घ्या

ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी योग्य ती माहिती घ्या

सुरक्षेची योग्य काळजी घेऊन ॲप डाऊनलोड करावा

फसवणूक झाल्याचं लक्षात आलं तर तात्काळ सायबर क्राईमकडे तक्रार करा अन्यथा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा असं आवाहन महाराष्ट्र सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आलं आहे.

Web Title: Fact Check: Download app to check blood oxygen level; Reveal the truth behind the message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.