शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
4
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
5
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
6
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
7
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
8
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
9
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
10
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
11
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
12
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
13
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
14
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
15
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
16
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
17
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
18
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
19
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
20
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज

Fact Check: कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सरकारच्या ‘या’ दोन योजनेचा लाभ मिळणार नाही? जाणून घ्या सत्य

By प्रविण मरगळे | Published: September 26, 2020 2:29 PM

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना २ लाख रक्कम दिली जाईल असं मेसेजमधून सांगण्यात आलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजबद्दल सत्यता लोकांना सांगितली आहे.

काय आहे दावा?कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत विम्याचा लाभ मिळणार नाही अशाप्रकारचा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

काय आहे वस्तुस्थिती?व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे.पीआयबी फॅक्टचेकनुसार पंतप्रधान सुरक्षा बीमा योजना (PMSBY) संबंधितांना विमा मिळत नाही, परंतु पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत काही विशिष्ट अटींसह कोरोनाच्या मृत्यूचा समावेश आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) काय आहे. या मेसेजमध्ये लिहिण्यात आलंय की, जर कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू कोरोना किंवा अन्य कारणास्तव झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीच्या पासबुक अकाऊंटवर १२ रुपये आणि ३३० रुपये व्यवहाराची एन्ट्री चेक करावी आणि विम्यासाठी दावा करावा.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठी ३३० रुपये आणि पंतप्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी १२ रुपये वर्षाला बँक अकाऊंटमधून जातात. त्या व्यक्तींना सरकारकडून २ लाखांचा विमा सुरक्षा दिला जातो. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना ही रक्कम दिली जाईल असं मेसेजमधून सांगण्यात आलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजबद्दल सत्यता लोकांना सांगितली आहे.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) काय आहे?भारत सरकार विविध योजनांद्वारे आपल्या नागरिकांना विम्याची सुविधा देते. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात गुंतवणूक करून एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला २ लाख रुपये मिळतात. मे २०१५ रोजी ही योजना सुरू केली गेली. पॉलिसीधारकाला वार्षिक ३३० रुपये जमा करावे लागतात.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना(PMSBY) म्हणजे काय ?या योजनेंतर्गत सरकार केवळ महिन्याला १ रुपये प्रमाणे २ लाखांचा मृत्यू विमा देते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०१६ मध्ये ही योजना सुरू केली होती. योजनेअंतर्गत वार्षिक १२ रुपये प्रिमियममध्ये संबंधित व्यक्तीला अनेक प्रकारचे विमा कव्हर दिले जातात. ही रक्कम आपल्या लिंक केलेल्या बँक खात्यातून दरमहा वजा केली जाते. अपघातात कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास २ लाख तर अंशतः अपंगत्व आल्यास १ लाख रुपये दिले जातील.

पीआयबी फॅक्ट चेक म्हणजे काय?पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या धोरणे, योजना, विभाग, मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. संबंधित कोणतीही बातमी सत्य आहे की खोटी आहे हे शोधण्यासाठी सरकार पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेते. पीआयबी फॅक्ट चेक वॉट्सअ‍ॅप नंबर 8799711259 वर स्क्रीनशॉट, ट्वीट, फेसबुक पोस्ट किंवा संशयास्पद बातम्यांची यूआरएल पाठवता येईल. या व्यतिरिक्त pibfactcheck@gmail.com वर ईमेलही करु शकतात.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या