Eye Challenge: डोळे मिचकावले तरी सापडेना! हरणं जिवाच्या आकांताने पळत होती, लोक वाघ शोधत होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 12:40 IST2021-11-14T12:40:09+5:302021-11-14T12:40:56+5:30

Eye Challenge, Find Tiger in this Picture: जंगलाचा राजा जरी सिंह असला तरी वाघाची दहशत आणि रुबाब काही कमी नसतो. वाघ जेव्हा शिकारीवर निघतो तेव्हा तो शिकार करूनच माघारी परततो.

Eye Challenge: Can you spot hiden tiger among the deer's? there is tiger hide in Photo | Eye Challenge: डोळे मिचकावले तरी सापडेना! हरणं जिवाच्या आकांताने पळत होती, लोक वाघ शोधत होते

Eye Challenge: डोळे मिचकावले तरी सापडेना! हरणं जिवाच्या आकांताने पळत होती, लोक वाघ शोधत होते

जंगलाचा राजा जरी सिंह असला तरी वाघाची दहशत आणि रुबाब काही कमी नसतो. वाघ जेव्हा शिकारीवर निघतो तेव्हा तो शिकार करूनच माघारी परततो. वाघाची डरकाळी भल्या भल्यांना घाम फोडते. असाच एक शिकार करतानाच्या वाघाचा फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये हरणं जिवाच्या आकांताने वाचण्यासाठी पळत आहेत पण लोकांना वाघ काही दिसत नाहीय. चला तुम्हाला तरी शोधता येतोय का पाहुया हा वाघ...

@Saket_Badola यांनी हा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये या हरणांमध्ये वाघाला तुम्ही शोधू शकता का असे विचारण्याच आले आहे. मात्र, फोटोत सर्वत्र हरणेच पळताना दिसत आहेत. याच्यामध्येच तुम्हाला वाघ लपलेला दिसेल. शोधून तर पहा, डोळ्यांचाही व्यायाम होईल. 

हा घ्या क्ल्यू...

काही युजरनी आता तुम्हीच सांगा वाघ कुठेय ते, शोधून शोधून दमल्याचा रिप्लाय केला आहे. तर काहींनी वाघाला पाहून अमिताभ बच्चन यांचे गाणे अरे दीवानो, मुझे पहचानो आठवल्याचे म्हटले आहे. 

Eye Challenge: भलेभले डोळे चोळून थकले! या फोटोतली मांजर काही दिसेना! तुम्ही पहा बघू सापडते का...

नाही सापडला का... हा पहा इथे लपलाय वाघ....


 

Web Title: Eye Challenge: Can you spot hiden tiger among the deer's? there is tiger hide in Photo

टॅग्स :Tigerवाघ