शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
5
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
6
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
7
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
8
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
9
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
10
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
11
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
12
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
13
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
14
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
15
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
16
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
17
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
18
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
19
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
20
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
Daily Top 2Weekly Top 5

धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 19:15 IST

EngineAI Robot kicks Company CEO: शक्तिशाली रोबोटने खुद्द कंपनीच्या सीईओलाच लाथ मारून जमिनीवर पाडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल

EngineAI Robot kicks Company CEO: तंत्रज्ञानाच्या जगात सध्या 'ह्युमनॉइड रोबोट्स'ची (मानवासारखे दिसणारे रोबोट) मोठी चर्चा आहे. मात्र, चीनमधील एका रोबोटिक्स कंपनीने नुकताच असा एक प्रयोग केला, ज्याचा व्हिडिओ पाहून जगभरातील नेत्यांपासून तंत्रज्ञांपर्यंत सर्वच थक्क झाले आहेत. 'EngineAI' या चिनी स्टार्टअपच्या एका शक्तिशाली रोबोटने खुद्द कंपनीच्या सीईओलाच लाथ मारून जमिनीवर पाडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

काय आहे नेमकी घटना?

EngineAI कंपनीने त्यांचा नवीन 'T800' हा ह्युमनॉइड रोबोट विकसित केला आहे. या रोबोटची ताकद आणि चपळता सिद्ध करण्यासाठी कंपनीने एक विशेष चाचणी घेतली. या चाचणीत कंपनीचे संस्थापक आणि सीईओ झाओ टोंगयांग (Zhao Tongyang) स्वतः रोबोटसमोर उभे राहिले. व्हिडिओमध्ये दिसते की, रोबोटने एक जोरात 'फ्रंट किक' मारली, ज्यामुळे सीईओ टोंगयांग थेट जमिनीवर कोसळले. त्यांनी संरक्षणासाठी शरीरावर जाड 'प्रोटेक्टिव्ह गियर' घातले होते, तरीही रोबोटचा प्रहार इतका जबरदस्त होता की त्यांना स्वतःचा तोल सावरता आला नाही.

असा प्रयोग का केला?

यापूर्वी EngineAI कंपनीने या रोबोटचे बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट्स करतानाचे काही व्हिडिओ शेअर केले होते. मात्र, अनेक नेत्यांनी आणि नेटकऱ्यांनी हे व्हिडिओ 'CGI' किंवा बनावट असल्याचा संशय व्यक्त केला होता. आपल्या रोबोटची ताकद खरी आहे आणि तो खरोखरच इतक्या वेगाने हालचाली करू शकतो, हे जगाला दाखवण्यासाठी सीईओ झाओ टोंगयांग यांनी स्वतःला धोक्यात घालून हा प्रयोग केला. प्रयोगानंतर त्यांनी सांगितले की, जर सुरक्षा कवच नसेल, तर या रोबोटच्या एका लाथेने कोणत्याही माणसाचे हाड मोडू शकते.

T800 रोबोटची खासियत काय?

हा रोबोट सुमारे ५.६ फूट उंच असून याचे वजन ८५ किलो आहे. हा रोबोट ३ मीटर प्रति सेकंद वेगाने चालू शकतो. यात NVIDIA AGX Orin एआय सिस्टम वापरण्यात आली असून त्याचे जॉइंट्स ४५० Nm टॉर्क निर्माण करतात, ज्यामुळे त्याला मानवासारखी ताकद मिळते. तसेचयात सॉलिड-स्टेट लिथियम बॅटरी आहे, जी ४ तासांपर्यंत उच्च क्षमतेने काम करू शकते.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता एआय आणि रोबोट्सच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा नवीन वाद सुरू झाला आहे. जर हे रोबोट्स मानवापेक्षा इतके शक्तिशाली झाले, तर भविष्यात ते मानवासाठी धोक्याचे ठरू शकतात का, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Robot Knocks Down CEO with One Kick; Viral Video Shocks!

Web Summary : A Chinese robotics company's T800 robot kicked its CEO, Zhao Tongyang, to demonstrate its power. The robot's strength sparked debate about AI safety and risks as the video went viral.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलRobotरोबोटSocial Mediaसोशल मीडियाViral Videoव्हायरल व्हिडिओchinaचीन