घरातून बाहेर पडल्यानंतर घराची चावी घरातच राहिली आहे, असं झालयं का कधी? जर तुमच्यासोबत असं झालं असेल तर नक्कीच तुमची फजिती झाली असणार. 'हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए' हे गाणं ऐकलं असेलच पण हे गाण्यापुरतचं मर्यादित असावं असं वाटतं. कारण जर खरचं चावी हरवली तर मात्र काय पंचायत होते, हे सांगणं फार कठिणचं. पण घराऐवजी जर ऑफिसचीच चावी हरवली तर? म्हणजेच, तुम्ही सकाळी ऑफिसमध्ये आलात पण ऑफिसचा दरवाजाचं उघडत नसेल तर...
एका छत्रीमुळे अडकला होता दरवाजा
ट्विटरवर नीरज अग्रवाल नावाच्या एका यूजरने एक पोस्ट केली आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या एका मित्रीची कंपनी पूर्ण दोन दिवसांसाठी बंद होती. सगळे कर्मचारी ऑफिसच्या बाहेरच होते. कारण होतं एका छत्रीचं. म्हणजे, छत्री ऑफिसच्या दरवाज्यामध्ये अशाप्रकारे अडकली होती की, अनेक प्रयत्न करूनही तो दरवाजा उघडतच नव्हता.
ट्विटरवर अनेक उपाय सांगत होते लोक
नीरजने केलेल्या या ट्विटला अनेक लोकांनी रिट्विट केलं आहे. एवढचं नाहीतर ट्विट वाचून अनेकांनी दरवाजा उघडण्यासाठी अनेक उपायही सांगितले आहेत. पण एकही उपाय लागू पडला नाही. 'वीवर्क' ही एक अमेरिकन रियल इस्टेट कंपनी आहे. जी टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सला वर्कस्पेस मिळवून देण्याचं काम करते.
शेवटी असा उघडला दरवाजा...
ट्विटरवर ही समस्या सोडवण्यासाठी अनेक उपाय सुचवण्यात आले. मीम्स शेअर करण्यात आले. अनेकांनी तर आनंद व्यक्त केला की, दोन दिवस ऑफिस बंद आणि कामापासून सुटका अशा कमेंट्सही शेअर केल्या. दरवाज्यात अडकलेली छत्री काढण्यासाठी अनेक जुगाड केले. पण दरवाजा काही उघडला नाही. शेवटी दोन दिवसांनी कंपनीने इंजिनिअर पाठवले आणि दरवाजा उघडला.
'ती छत्री माझी होती, ज्यामुळे ऑफिसचा दरवाजा बंद झाला होता.'
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विलन ठरलेली छत्री ज्या व्यक्तीची होती त्यानेही ट्विटरवर घडलेला प्रकार शेअर केला. त्याने सांगितले की, छत्री फिजिक्सचे सर्व रूल अप्लाय करून दरवाजामध्ये अशी अडकली होती की, काही केल्या तो दरवाजा उघडत नव्हता.