Elephant Video: वन्य प्राण्यांच्या जवळ जाऊन फोटो काढणे धोकादायक ठरू शकते. खासकरुन हत्तीसारख्या महाकाय प्राण्याच्या जवळ जाणे टाळावे. हत्ती शांत स्वभावाचे असतात, परंतु एखादा आवाज किंवा मानवी कृतीमुळे त्यांना राग येऊ शकतो. रागात असलेल्या हत्तीला आवरणे खूप अवघड बाब आहे. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात कारच्या हॉर्नमुळे रागात आलेल्या हत्तीने एका व्यकीतीला चिरडल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील गुंडुलपेट तालुक्यात असलेल्या बांदीपूर राष्ट्रीय उद्यानात रविवारी संध्याकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. एक जंगली हत्ती रस्ता ओलांडण्यासाठी जंगलातून बाहेर आला. मात्र, रस्त्यावरील वाहनचालकांच्या गर्दीने आणि कारच्या आवाजाने हत्ती संतापला. यावेळी एक तरुण हत्तीजवळ जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करू लागला. हे पाहून हत्ती आणखी संतापला आणि त्याने तरुणाचा पाठलाग करुन पायाखाली चिरडले.
सुदैवाने त्या तरुणाचा जीव वाचला, परंतु त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्या तरुणाच्या मित्रांनी तत्परता दाखवली आणि त्याला ताबडतोब म्हैसूरमधील रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, चामराजनगर जिल्ह्यातील ८७४ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात मोठ्या संरक्षित क्षेत्रांपैकी एक आहे. हे उद्यान त्याच्या जैवविविधतेसाठी आणि विशेषतः वाघ आणि हत्तींसाठी प्रसिद्ध आहे.
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video