शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

Elephant Fight Video : दोन हत्तींची अशी भीषण झुंज तुम्ही कधीच पाहिली नसेल; एका धडकेत झाडाचाही चुराडा झाला - पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 16:01 IST

ही झुंज पाहून आपल्याही लक्षात येईल की, यांच्या भांडणात जे काही येते ते उद्ध्वस्त होते.

हत्ती हा एक अतिशय शांत, हुशार आणि भावनिक प्राणी आहे. हत्तीमध्ये प्रचंड शक्ती असते. जिचा कुणी अंदाज लावू शकत नाही. म्हणूनच जेव्हा एखाद्या हत्तीला राग येतो किंवा तो बिथरतो, तेव्हा अगदी 'जंगलाचा राजा' सिंहही नाद करत नाही. या महाकाय प्राण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. या प्राण्याचा असाच एक नवा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून आपल्याही अंगावर शहारा येईल. या व्हिडिओमध्ये दोन हत्ती भांडतांना अथवा झुंजताना दिसत आहेत. ही झुंज पाहून आपल्याही लक्षात येईल की, यांच्या भांडणात जे काही येते ते उद्ध्वस्त होते. हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील उत्तर-पूर्व भागात असलेल्या क्रुगर नॅशनल पार्कमधील (Kruger National Park) असल्याचा दावा केला जात आहे.

जेव्हा झाडावर गेला हत्ती- हा व्हिडीओ केवळ 28 सेकंदांचा आहे. यात दोन महाकाय हत्ती रस्त्यावर भांडताना दिसत आहेत. हे दोन्ही हत्ती एकमेकांना जोरदार धडका देत आहेत. त्याच्या जवळच एक झाडही आहे. भांडताना हे हत्ती त्या झाडाच्या अगदी जवळ जातात. दरम्यान, एक हत्ती दुसऱ्या हत्तीला एवढी जोराची धडक देतो की, दुसरा हत्ती थेट त्या झाडावरच जातो. यामुळे या झाडाचा पार चुराडा होतो आणि ते जमिनीवर कोसळते. मात्र, हत्ती स्वत:ला सावरत रस्त्यावर येतो आणि येथेच व्हिडिओ संपतो. आता या लढाईत कोणता हत्ती जिंकला आणि कोणता हत्ती हरला? हे समजू शकलेले नाही. मात्र हत्तीची शक्ती पाहून, बरे झाले जंगल जंगल सफारीसाठी गेलेले लोक हत्तापासून दूरच राहीले, अशा प्रतिक्रिया लोक सोशल मिडियावर देत आहेत.

या प्राण्यांमध्ये असते कमालीची ताकद - हा व्हिडिओ @SANParks नावाच्या ट्विटरवर 23 मार्चला पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शन मध्ये म्हणण्यात आले आहे, जेव्हा हत्ती झुंजतात, तेव्हा झाडांचेही नुकसान होते. या व्हिडिओला आतापर्यंत 20 हजारहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच 78 हजारहून अधिक वेळा हा व्हिडिओ बघण्यात आला आहे. यावर युजर्स प्रतिक्रियाही देत आहेत. काही लोकांनी म्हटले आहे, की हे झाड तर असे तुटले, जसे एखादी काडेपेटीतील काडी. तसेच एकाने म्हटले आहे, की या विशालकाय प्राण्यांमध्ये कमालीची ताकद असते. तसेच काही लोकांनी हा व्हिडिओपाहून आश्चर्यही व्यक्त केले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाforestजंगल