शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजार वर्ष जुन्या पेटीत बंद होती ममी; अन् उघडल्यावर दिसलं 'असं' काही, पाहा व्हिडीओ

By manali.bagul | Updated: October 6, 2020 15:02 IST

Viral video Marathi : इजिप्तमधील मिस्त्र येथे पुरातत्व विभागातील कामगारांनी प्राचीन ममीची पेटी(Ancient Mummy Coffin) उघडली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

जेव्हाही प्राचीन इजिप्तबद्दल बोललं जातं तेव्हा वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. जसे की, ममी, मकरबरा आणि पिरॅमिड. इथे उत्खननात नेहमीच प्राचीन ममी मिळतात. आज आम्ही तुम्हाला या ममीचा एक व्हिडीयो दाखवणार आहोत. इजिप्तमधील मिस्त्र येथे पुरातत्व विभागातील कामगारांनी प्राचीन ममीची पेटी(Ancient Mummy Coffin) उघडली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार या वर्षाच्या सुरूवातील ५६ बंद पेट्या सापडल्या होत्या. त्यातील १२ पेक्षा जास्त पेट्या या साककारा मध्ये उघडण्यात आल्या होत्या. साककारा मिस्त्र येथिल विशाल, प्राचीन दफन मैदान आहे. 

मिस्त्र पर्यटन आणि पुरातत्व मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार साककाराच्या पुरातत्व क्षेत्रात दफन विहिरांमध्ये ५९  लाकड्याचा पेट्यांचा शोध घेण्यात आला होता. लाकडाच्या पेट्या चांगल्या स्थितीत होत्या. या पेट्यांमध्ये  प्रतिष्ठीत आणि वरिष्ठ लोकांच्या मृतदेहांचा समावेश होता. शनिवारी एक पेटी (Ancient Mummy Coffin) पहिल्यांदा उघड्यात आली. जवळपास २ हजार ५०० वर्षांपूर्वी ही पेटीबंद करण्यात आली होती. पर्यटन आणि पुरातत्व मंत्रालयाकडून याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओत एक ममी होती. एका  दफन कापडात गुंडाळून ठेवण्यात आला होती. Video: बापरे! नशेच्या धुंदीत महिला वॉशिंग मशिनमध्ये अडकली, बाहेर निघता निघेना, अन् मग....

हा व्हिडीओ ट्विटरवर ५ ऑक्टोबरला शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत १० लाखांपेक्षा अधिकवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. १ लाखांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. 72 हजारांपेक्षा जास्तवेळा हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अनेक लोकांनी हजारो वर्षांपूर्वीची पेटी उघडणं म्हणजे २०२० मधील सगळ्यात चांगली कारवाई असल्याचे म्हटले आहे. नॅशनल ज्योग्राफिकच्या रिपोर्टनुसार पॉप संस्कृती आणि लोककथांमध्ये ममीची पेटी उघडल्यानंतर मृत्यू किंवा अभिशाप होतो असं मानलं जातं. न्युजिलँडचे राजदूत ग्रेग लुईस यांनी ट्विटरवर शनिवारी हा व्हिडीओ शेअर केला होता. Video : ऐन गर्दीच्या वेळी अचानक सुपर मार्केटचं सिलिंग कोसळलं; अन्....पाहा थरारक व्हिडीओ

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके