शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मॅरेथॉनमध्ये दिग्गज स्पर्धक पण लक्ष वेधुन घेतलं बदकाने, स्पर्धकांच्या जोडीला धावतोय हे बदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 15:50 IST

नुकतीच एक अनोखी घटना समोर आली आहे. या मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांच्या जोडीने धावणाऱ्या एका बदकानंच सगळ्यांच्या नजरा वेधून घेतल्या. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या (Duck becomes center of attraction in marathon race)स्पर्धकांऐवजी एका बदकानेच सर्वांचं लक्ष वेधून घेतल्याची घटना नुकतीच घडली. साधारणतः मॅरेथॉन स्पर्धा पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक हे त्या स्पर्धेत येणाऱ्या दिग्गज खेळाडूंना पाहण्यासाठी येत असतात. त्यांची स्टाईल, त्यांचा वेग आणि एकंदर स्पर्धा जिंकण्यासाठी ते करत असलेली स्ट्रॅटेजी यासाठी मॅरेथॉनला गर्दी जमत असते. मात्र नुकतीच एक अनोखी घटना समोर आली आहे. या मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांच्या जोडीने धावणाऱ्या एका बदकानंच सगळ्यांच्या नजरा वेधून घेतल्या. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

न्यूयॉर्कमध्ये ५० वी मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच पार पडली. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. मात्र यंदा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या एकाने पाळलेलं हे बदक त्याच्यासोबत मॅरेथॉनमध्ये धावताना दिसलं. त्याचं सर्वांना इतकं कौतुक वाटलं की सर्वांचे मोबाईल आणि कॅमेरे स्पर्धक सोडून या बदकावर केंद्रीत झाले.

इतर स्पर्धकांप्रमाणे बदकानेही मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला की काय, असं वाटण्यासारखं चित्र होतं. कारण बदकदेखील इतर स्पर्धकांसोबत अगदी जीव तोडून धावत असल्याचं दिसत होतं. अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात ही घटना कैद केली आणि सोशल मीडियावर पोस्ट केली. या व्हिडिओत पायात लाल रंगाचे बूट परिधान करून मोठ्या ऐटीत बदल रनिंग ट्रॅकवर धावताना दिसत आहे. मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत आणि घोषणा देत या बदकाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.

बदकानं मॅरेथॉनमध्ये घेतलेल्या सहभागाचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. बदकाची धाव आपल्याला भलतीच आवडल्याची प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामMarathonमॅरेथॉन