शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

Viral Video: कोंबड्याने अन् बदकाने तरुणीला पळता भुई केली थोडी, रडत-रडतच पळ काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 18:45 IST

एका बदकाने आणि कोंबड्याने मिळून तरुणीला अक्षरशः नाकीनऊ आणल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ (Shocking Video Viral) अतिशय मजेशीर असून लोकांच्या पसंतीसही उतरत आहे.

बदक आणि कोंबडा किंवा कोंबडी हे असे पक्षी आहेत, जे लोक मोठ्या संख्येनं पाळतात. बदक हे जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीकडे राहू शकतात. मात्र कोंबड्यांमध्ये हा गुण नाही. मात्र या दोन्ही पक्षांची चोच अतिशय धारदार असते. यामुळे ते कोणालाही जखमी करू शकतात. सध्या सोशल मीडियावर याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Duck and Chicken Attacked on a Girl) होत आहे. यात एका बदकाने आणि कोंबड्याने मिळून तरुणीला अक्षरशः नाकीनऊ आणल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ (Shocking Video Viral) अतिशय मजेशीर असून लोकांच्या पसंतीसही उतरत आहे.

सोशल मीडियावर सतत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र असे व्हिडिओ अतिशय कमीच पाहायला मिळतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुणी एका बगीच्यामध्ये येते. इथे आधीपासूनच भरपूर बदक आणि कोंबड्या असतात. तरुणीला पाहताच आधी बदक तिच्यावर हल्ला करायला सुरुवात करतो आणि तिचा पाय आपल्या चोचीने जखमी करतो. यानंतर बदक दूर जाताच कोंबडा तिथे येतो आणि या तरुणीवर हल्ला करण्यास सुरुवात करतो. तोदेखील तिचा पाय आपल्या चोचीने जखमी करू लागतो. तरुणीच्या चेहऱ्यावरील हावभाव एकदम बदलतात मात्र तरीही ती स्वतःला सावरते आणि तिथून पळ काढते.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ earthdixe नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत ११ मिलियन म्हणजेच १.१ कोटीहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर २ लाखहून अधिकांनी व्हिडिओ लाईक केला आहे.

अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने यावर कमेंट करत लिहिलं, त्यांचे पंजे घातक ठरू शकतात. त्यात भरपूर कचरा असतो आणि सोबतच ते धारदार आणि मोठेही असतात. तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत लिहिलं, तो दिवस नक्की चिकन सूपचा दिवस असेल. याशिवाय इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम