Video - अरे देवा! दारूच्या नशेत माणूस साइनबोर्डवर चढला; थेट पुशअप्स मारू लागला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 10:24 IST2023-06-22T10:14:36+5:302023-06-22T10:24:37+5:30

खूप उंचीवर लावलेल्या साईनबोर्डवर एक मद्यधुंद व्यक्ती दिसत आहे. तो चक्क तिथे पुशअप्स करताना दिसला

drunk man did pushups on signboard watch viral video from odisha here | Video - अरे देवा! दारूच्या नशेत माणूस साइनबोर्डवर चढला; थेट पुशअप्स मारू लागला अन्...

Video - अरे देवा! दारूच्या नशेत माणूस साइनबोर्डवर चढला; थेट पुशअप्स मारू लागला अन्...

दारूच्या नशेत माणूस काय करतो, हेही कळत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये खूप उंचीवर लावलेल्या साइनबोर्डवर एक मद्यधुंद व्यक्ती दिसत आहे. तो चक्क तिथे पुशअप्स करताना दिसला. याबाबत लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. 

तेलंगणातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती होर्डिंगला लटकलेला आढळला होता. आता हा नवीन व्हिडीओ ओडिशातून समोर आला आहे. यामध्ये प्रथम दिसणारी व्यक्ती साइनबोर्डच्या मध्यभागी जाऊन योगासने करते. त्यानंतर तो पुशअप्स करायला लागतो. दरम्यान, खाली उपस्थित असलेले लोक आपली वाहने थांबवून त्याच्याकडे पाहू लागले. तर काही वाहने खालून जात असतात. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केल्यानंतर हा व्हिडीओ ओडिशातील संबलपूरमध्ये रेकॉर्ड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लोकांनी शेअर केला आहे. यावर लोक खूप कमेंट करत आहेत. या मद्यधुंद व्यक्तीबद्दल अनेकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे, तर काही लोकांचे म्हणणे आहे की, अशा निष्काळजीपणाबद्दल त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. अधिकारी आल्यानंतर या व्यक्तीचे काय झाले, अशी विचारणा काही लोकांनी केली.

एका युजरने सांगितले की, दुसरी जागा मिळाली नाही. लाईक मिळवण्यासाठी आकाशात पुशअप्स मारत आहे. पडला तर काहीच उरणार नाही. आणखी एका युजरने म्हटले की, "या गरीब माणसाला जिम कुठे आहे हे देखील माहीत नाही, रस्त्यावर झोपला असता तर बरं झालं असतं." तिसरा युजर म्हणाला, 'हे काहीतरी नवीन आहे. देशी दारूचे साइड इफेक्ट्स.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: drunk man did pushups on signboard watch viral video from odisha here