शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

डॉक्टरांनी कोरोना रुग्णाला मृत घोषित केलं; बाबांसाठी लेक दीड तास रडली, नंतर घडलं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 14:24 IST

Doctor declared old man dead : एका रुग्णालयात भंवरसिंग चौहान नावाच्या ७० वर्षीय आजोबांना कोरोनामुळे मृत घोषित करण्यात आलं. मृत्यूनंतरची पुढची तयारीसुद्धा कुटुबांन सुरू केली होती.

गेल्या २ महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झालेली पाहायला मिळत आहे. देशात कोरोनामुळे होत असलेल्या मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा वैद्यकीय यंत्रणेचा निष्काळजीपणा रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येत आहे. अशीच एक घटना राजस्थानातील बिकानेरमधून समोर आली आहे.

एका रुग्णालयात भंवरसिंग चौहान नावाच्या ७० वर्षीय आजोबांना कोरोनामुळे मृत घोषित करण्यात आलं. मृत्यूनंतरची पुढची तयारीसुद्धा कुटुबांन सुरू केली होती.  रुग्णालय प्रशासनाकडून कागदपत्र तयार करून रुग्णांच्या नातेवाईकांकडे मृतदेह सोपावला जाणार होता. त्याचवेळी अचानक या आजोबांनी श्वास घ्यायला सुरूवात केल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Fact Check : कोविड अलर्ट! पाण्याद्वारेही वेगाने होतोय कोरोनाचा फैलाव?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

दुसरीकडे वडीलांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर मुलगी धावतच रुग्णालयात पोहोचली. वडील आपल्यात राहिलेले नाहीत याचा विचार करून मुलीला खूप रडू कोसळत होतं. जवळपास दीड- दोन तास लेक रडत राहिली. त्यानंतर अचानक भंवरसिंग चौहान यांच्या शरीरात हालचाली सुरू झाल्या. त्यांना श्वास घेता येऊ लागला. त्यानंतर उपस्थितांनी त्वरित याबाबत डॉक्टरांना माहिती दिली. आपले वडील जीवंत असल्याचं कळताच लेकीला आनंद झाला. 

अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

आता जीवंत व्यक्तीला मृत घोषित का करण्यात आलं? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  4 मे रोजी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान शनिवारी दुपारी त्यांच्या ऑक्सिजन पातळीत घट झाली आणि तब्येत जास्त बिघडली. यानंतर डॉक्टरांनी ईसीजी काढून ऑक्सिजनचं प्रमाण वाढवलं. एका तासानंतर डॉक्टरांनी भंवरसिंग यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी संबंधित  डॉक्टरांची चौकशी केली जाईल, असं आश्वासन औषध विभागाचे अध्यक्ष डॉ. बी. के. गुप्ता यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना दिलं आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूRajasthanराजस्थानhospitalहॉस्पिटल