Doctor could not find a bed : 'इथं VIP लोकांना प्राधान्य, डॉक्टरला कोणी विचारत नाही.' स्वतः काम करत असलेल्या रुग्णालयात डॉक्टरला मिळेना बेड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 12:11 PM2021-04-18T12:11:59+5:302021-04-18T12:25:08+5:30

Doctor could not find a bed Viral News : 'येथे व्हीआयपी लोकांना प्राधान्य दिले जाते. इथल्या डॉक्टरांना कोणी विचारत नाही. डॉक्टरांसाठी काहीतरी करा. '

Doctor could not find a bed Viral News : Delhi covid positive doctor could not find a bed for himself in his own hospital | Doctor could not find a bed : 'इथं VIP लोकांना प्राधान्य, डॉक्टरला कोणी विचारत नाही.' स्वतः काम करत असलेल्या रुग्णालयात डॉक्टरला मिळेना बेड

Doctor could not find a bed : 'इथं VIP लोकांना प्राधान्य, डॉक्टरला कोणी विचारत नाही.' स्वतः काम करत असलेल्या रुग्णालयात डॉक्टरला मिळेना बेड

Next

संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार पसरलेला पाहायला मिळत आहे. दररोज नवीन प्रकरणे आणि मृत्यूची आकडेवारी नवीन विक्रम स्थापित करीत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा ढासळली आहे आणि परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की रुग्णालयांमध्ये बेड मिळवणे कठीण झाले आहे. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि रेमेडिसवीर सारख्या औषधांची कमतरता आहे. आपण या परिस्थितीचा अंदाज लावू शकता की राजधानी दिल्लीतील एका डॉक्टरांना ते ज्या  रुग्णालयातमध्ये काम करत होते. त्या  बेड मिळू शकला नाही.

दिल्लीतील प्रसिद्ध राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये काम करणारे निवासी डॉक्टर मनीष जांग्रा जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह झाले तेव्हा त्यांची प्रकृती बिघडू लागली. यानंतर जे घडले ते आश्चर्यकारक आहे. डॉक्टर मनीष ज्या ठिकाणी काम करत आहे त्याच रुग्णालयात त्याला बेड मिळू शकला नाही. यावरून आपण अंदाज लावू शकता की परिस्थिती किती  गंभीर असेल. जेव्हा डॉ मनीष यांनी बेड मिळाला नाही तेव्हा त्यांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती केली.

जेव्हा डॉक्टर मनीष यांचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा लोक त्याच्या मदतीसाठी सोशल मीडियावर जमा झाले आणि त्याचा परिणाम म्हणून मनीष यांना बेड उपलब्ध झाला आहे. पण डॉक्टर मनीष आपल्या व्हिडीओमध्ये ज्या व्हीआयपी संस्कृतीबद्दल बोलले ते आश्चर्यचकित आहे. व्हिडिओमध्ये मनीष  ते म्हणाले, 'माझे नाव मनीष जांग्रा आहे. मी आरएमएल रुग्णालयात डॉक्टर आहे. इथं डॉक्टर असूनही मला बेड मिळत नाही. व्हिआयपी लोकांनी बेड्स भरले आहेत. येथे व्हीआयपी लोकांना प्राधान्य दिले जाते. इथल्या डॉक्टरांना कोणी विचारत नाही. डॉक्टरांसाठी काहीतरी करा. ' एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!

दरम्यान शनिवारी दिल्लीत  २४ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे लक्षात घेता उपराज्यपाल अनिल बैजल यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना  एक हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश दिले जेणेकरुन लोकांना रूग्णालयात बेडच्या उपलब्धतेबाबत माहिती व्हावी.'' बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा.....
 

Web Title: Doctor could not find a bed Viral News : Delhi covid positive doctor could not find a bed for himself in his own hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.