Doctor clad in PPE kits grooves to song Garmi, netizens love it, Watch video | PPE किट घालून डॉक्टरने केला भन्नाट डान्स; 5 लाखवेळा पाहिला गेला व्हिडीओ

PPE किट घालून डॉक्टरने केला भन्नाट डान्स; 5 लाखवेळा पाहिला गेला व्हिडीओ

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झालीजुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

महाराष्ट्र राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. गुरुवारी सर्वाधिक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळतील असून ७०३३ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना संकटात डॉक्टर्स, आरोग्य सेवक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे प्रत्येक जण त्यांचे आभार मानत आहेत.

न थकता, न थांबता हे डॉक्टर रुग्णांना बरे करण्यासाठी झटत आहेत. पण, याही संकटाच्या काळात स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करताना काही डॉक्टर दिसत आहेत. अशाच एका डॉक्टरचा डान्सिंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गर्मी या गाण्यावरी हा डान्स आतापर्यंत जवळपास 5 लाखवेळा पाहिला गेला आहे. डॉक्टर रिचा नेगी यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे. त्यावर त्यांनी वरुण धवन व नोरा फतेही यांच्या गर्मी या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळत आहे. ही डॉक्टर चक्क PPE किट घालून डान्स करत असल्यानं सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे.  

डॉक्टर रिचा नेगी यांनी लिहिलं की,''या संकटाच्या काळात आणि उकडंत असतानाही आम्ही रुग्णांची सेवा करत आहोत. आम्हाला याही परिस्थितीत आजूबाजूला कोणतीच नकारात्मकता फिरकू द्यायची नाही.'' 1 जुलैला पोस्ट केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 4 लाख 91,917 वेळा पाहिला गेला आहे. 

पाहा व्हिडीओ...

बाबो: 89 वर्षांचे वडील अन् 65 वर्षांची बहीण; फॉर्म्युला वनच्या माजी बॉसला पुत्ररत्न!

सुशांत सिंग राजपूतचा मित्र अन् दिग्गज बॉक्सरवर कोसळला दुःखाचा डोंगर!

Fact check: चीनला विरोध करणाऱ्या हाँगकाँगच्या आंदोलकांमध्ये खरंच दिसले का किम जोंग-उन?

ENGvsWI : इंग्लंड संघावर कोरोना संकट? खेळाडूची प्रकृती अचानक बिघडली, झाला सेल्फ आयसोलेट 

इरफान पठाणला 'पुढील हाफिज सईद' म्हणणाऱ्या पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा म्हणते...

पाकिस्तानी खेळाडूचा प्रताप; वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान पत्नीला लपवलं होतं कपाटात

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Doctor clad in PPE kits grooves to song Garmi, netizens love it, Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.