"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 17:10 IST2025-08-22T17:10:27+5:302025-08-22T17:10:43+5:30

पहिल्या नजरेत माझे नाते कसे वाटू शकते याची मला जाणीव आहे परंतु मी आनंदी आहे हे मला माहिती आहे असंही डायनाने स्पष्ट केले. 

Diana Montano love Story: I'm 25 and my boyfriend is 76 we're happily in love; viral couple on the internet | "मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...

"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...

सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याची बरीच चर्चा आहे. त्यामागचे कारण म्हणजे या दोघांमधील वयाचे अंतर...एकीकडे मुलगी २५ वर्षाची तर तिचा प्रियकर ७६ वर्षांचा आहे. या दोघांनी उघडपणे समोर येऊन त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. काही जण त्यांच्या प्रेमाचं कौतुक करतात तर काही त्यावर आक्षेप घेतायेत. 

ही कहाणी आहे सॅन डिएगो आणि डायना मोंटानो यांची..डायनाने तिच्या प्रेमाची कहाणी एका मुलाखतीत सांगितली. ती म्हणाली की, मी २५ वर्षांची आहे तर माझा बॉयफ्रेंड ७६ वर्षांचा आहे. आमच्या दोघांमध्ये ५१ वर्षाचं अंतर असूनही आम्ही एकमेकांसोबत आनंदाने राहत असून दोघांचे खूप प्रेम आहे.  डायनाने ती स्वत: ५१ वर्ष मोठ्या प्रियकराला भेटली, कसं दोघांमध्ये प्रेम झाले, त्याशिवाय प्रेमात वयाचे एवढे अंतर असताना समाजाने त्यांना कसं नाकारले, त्यांना काय काय सहन करावे लागले याबाबत सांगितले आहे.

आम्ही दोघे एका मॅच्युअल फ्रेंडच्या माध्यमातून भेटलो, त्यावेळी आमच्यात प्रेम वैगेरे काही नव्हते. त्यानंतर आमच्यात हळूहळू जवळीक वाढली, आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. जुलै २०२४ मध्ये अधिकृतपणे आम्ही लग्न केले. परंतु आमच्या दोघांच्या प्रेमामुळे इंटरनेटवर बरीच चर्चा झाली. माझ्या कुटुंबालाही लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. नात्यामधील वयाचे अंतर हे त्याचे केंद्र नाही. लोक आजही आम्हाला सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर एकटक बघत असतात. परंतु वेळेनुसार सर्व काही बदलेल असा विश्वास डायनाने व्यक्त केला. 

दरम्यान, आम्ही दोघे वेगवेगळ्या पिढीचे असलो तरी माझ्या बॉयफ्रेडला माझ्याशी जुळवून घेण्यास त्रास झाला नाही कारण आमच्यात खूप गोष्टीचं साम्य आहे. आमच्या दोघांमधील वयाचे अंतर हे समाज स्वीकारायला तयार नाही. माझे कुटुंबातील काही जण माझ्या निर्णयाशी सहमत नाहीत. मी माझे आयुष्य बर्बाद केले असा विचार ते करतात, पण मला त्याने फार त्रास होत नाही. पहिल्या नजरेत माझे नाते कसे वाटू शकते याची मला जाणीव आहे परंतु मी आनंदी आहे हे मला माहिती आहे असंही डायनाने स्पष्ट केले. 
 

Web Title: Diana Montano love Story: I'm 25 and my boyfriend is 76 we're happily in love; viral couple on the internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.