ढिंचॅक पूजाचा नवा व्हिडीओ रिलीज, बघा पण तुमच्या रिस्कवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 11:53 IST2018-10-11T11:50:56+5:302018-10-11T11:53:15+5:30

सोशल मीडियात काही दिवसांपासून सेन्सेशन ठरत असलेली ढिंकचॅक पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Dhinchak Pooja Is Back With A New Song | ढिंचॅक पूजाचा नवा व्हिडीओ रिलीज, बघा पण तुमच्या रिस्कवर!

ढिंचॅक पूजाचा नवा व्हिडीओ रिलीज, बघा पण तुमच्या रिस्कवर!

सोशल मीडियात काही दिवसांपासून सेन्सेशन ठरत असलेली ढिंकचॅक पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'सेल्फी मैने लेली आज' या तिच्या व्हिडीओने धुमाकूळ घातल्यांनतर आता ती आणकी एक व्हिडीओ घेऊन आली आहे. 'स्वॅग मेरा स्टाईल' असं या व्हिडीओचं टायटल आहे. 

ढिंकचॅक पूजाचे आधीचे व्हिडीओ चांगलेच गाजले. आता तिचा हा नवाही चर्चेचा विषय ठरला आहे. ९ ऑक्टोबरला व्हिडीओ पब्लिश करण्यात आला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे तिचे चाहते तर या व्हिडीओचं कौतुक करत आहेत तर काही लोक तिला नावं ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

पूजाचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले. त्यामुळे तिने कमाई सुद्धा चांगलीच केली. अशात आता पूजा ओळखायलाही येत नाही असा तिचा नवा लूक झाला आहे. 

Web Title: Dhinchak Pooja Is Back With A New Song